अहमदनगर Live24 टीम, 22 जुलै 2021 :- राहुरी तालुक्यातील तांदुळवाडी येथील ग्रामसेवकाने घराच्या जागेची दप्तरी नोंद लावण्यासाठी ७ हजार रूपयांची लाचेची
मागणी केल्याप्रकरणी ग्रामसेवकासह पाणी पुरवठा कर्मचा-यावर भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
रेल्वे स्टेशन येथील एकाच्या फिर्यादी वरून ग्रामसेवक अभय भाऊराव सोनवणे व ग्रामपंचायत पाणी पुरवठा कर्मचारी नवनाथ धसाळ यांच्या विरोधात राहुरी पोलिस ठाण्यात गुरन.व कलम ५७९\२०२१ भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम १९८८ चे कलम ७ अ १२ प्रमाणे दाखल करण्यात आला आहे.
तक्रारदाराने फिर्यादीत म्हटले आहे की , पहिली पत्नी हिच्या नावावर तांदुळवाडी शिवारात गट नंबर ३९ पैकी २ आर घर जागा दुसरी पत्नी हिच्या नावे नोटरी करून दिली होती.
सदर जागेची ग्रामपंचायत मध्ये दप्तरी नोंद ग्रामसेवक सोनवणे यांच्याकडून करून घेण्यासाठी पाणी पुरवठा कर्मचारी धसाळ याने ७ हजार रुपये लाचेची मागणी केली होती.
त्यामुळे सदर ग्रामसेवक आणि पाणीपुरवठा कर्मचारी या दोघांवर लाच मागितल्याचा गुन्हा राहुरी पोलीस ठाण्यात गुरूवार दि.२२ जूलै रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पुढील तपास पोलीस लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस निरीक्षक शाम पवरे करत आहेत.