ऊसतोड करणाऱ्या महिलेचा विनयभंग एका विरुद्ध गुन्हा दाखल

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 25 मार्च 2021:- एका महिला ऊसतोड कामगाराचा विनयभंग करण्यात आला आहे. ही घटना नेवासा तालुक्यातील सलाबतपूर येथे घडली असून, याप्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, पीडित महिला ही मूळची बीड जिल्ह्यातील रहिवासी आहे. ही महिला आपल्या कोपीत झोपलेली होती.

दि.२१ मार्च २०२१ रोजी सुशिल बारीकराव खाडे (मूळचा रा. चिखली, ता. वडवणी, जि. बीड, हल्ली रा. सलाबतपूर) याने या पीडित महिलेच्या कोपीत जाऊन या महिलेचा विनयभंग केला.

मात्र या दरम्यान महिलेने आरडाओडा केला असता आरोपी खाडे याने महिलेला, तिच्या मुलाला व पतीलाही शिवीगाळ केली.

याबाबत पीडित महिलेच्या फिर्यादीवरून नेवासा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास शेवगाव विभागाचे पोलीस उपअधीक्षक करीत आहेत.

  • ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|
अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24