अहमदनगर Live24 टीम, 25 ऑगस्ट 2021 :- चारचाकी गाडी खरेदीसाठी माहेरहून दोन लाख रुपये घेऊन यावेत या कारणावरून विवाहितेला मारहाण झाल्याचा धक्कादायक प्रकार राहुरी तालुक्यातील सोनगाव येथे घडला आहे.
याप्रकरणी पीडितेच्या फिर्यादीवरून सोनई पोलीस ठाण्यात सासरच्या चार जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत अधिक माहिती अशी कि,
चार चाकी गाडी घेण्यासाठी माहेरहून दोन लाख रुपये घेऊन येण्याच्या मागणीसाठी ऑगस्ट 2018 ते 18 ऑगस्ट 2021 या कालावधीत शारीरिक व मानसिक छळ करून वारंवार शिवीगाळ करत मारहाण करून
उपाशीपोटी ठेवून फिर्यादीचा शारीरिक व मानसिक छळ करून फिर्यादीला व फिर्यादीच्या मुलाला जीवे मारण्याची धमकी देत घरातून हाकलून दिले आहे. असे फिर्यादीत नमूद केले आहे.
माधुरी निलेश नालकर (वय 23) रा. सोनगाव सात्रळ ता. राहुरी (हल्ली रा. पानेगाव ता. नेवासा) यांच्या फिर्यादीवरून पती निलेश अण्णासाहेब नालकर, सासू मंगल अण्णासाहेब नालकर, जाव नम्रता प्रमोद नालकर, भाया प्रमोद अण्णासाहेब नालकर सर्व रा. सोनगाव सात्रळ यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.