जातीवाचक शिवीगाळ केल्याप्रकरणी पोलिसात गुन्हा दाखल

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 16 एप्रिल 2021 :-नवलेवाडी परिसरातील जागा येणे करिता दिलेल्या पैसे परत घेण्यासाठी गेलेल्या एका कुटुंबास शिवीगाळ करून

कानशिलात मारून जातीवाचक शिवीगाळ केल्याप्रकरणी जनार्धन कमलाकर नवले (रा. नवलेवाडी) यांच्यावर अनुसूचित जाती-जमातीच्या कायदा कलमाखाली पोलिसात गुन्हा दाखल झाल्याने खळबळ उडाली आहे.

अकोले पोलीस स्टेशनमध्ये विवाहीतेने दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, आमचा गुरुव झाप शिवारात २० गुंठे शेतीचा प्लॉट असून

हा प्लॉट येणे करावयाच्या असल्याने नवलेवाडी येथील जनार्धन कमलाकर नवले यांच्यासोबत सन जानेवारी २०१८ मध्ये त्यांना येणे करण्यापोटी एक लाख रुपये दिले.

त्यांच्याकडून पैसे दिल्याची तशी पावती लिहून घेतली होती. परंतु एक वर्षापर्यंत आमचा प्लॉट येणे करून दिला नाही म्हणून आम्ही त्यांना सदर बाबत विचारणा केली असता

ते आम्हाला उडवा-उडवीचे उत्तरे देऊन आमचे बरोबर वाद घालत होते. त्यावेळी माझे पती यांनी अकोले पोलीस स्टेशनमध्ये त्यांच्याविरुद्ध तक्रार केली होती.

बुधवारी सायंकाळी मी व माझे पती असे दोघे नवले यांना दिलेले पैसे मागे घेण्यासाठी नवले यांचे बिल्डिंगचे खाली जाऊन पैसे मागितले असता नवले यांनी माझे खांद्यावर हात ठेवून मला लज्जा उत्पन्न होईल, असे वर्तन केले.

माझ्या हाताला धरून माझ्या बरोबर ओढतान करू लागला. तेव्हा माझे अपंग असलेले पती मला सोडविण्यासाठी मध्ये आले असता त्यांना नवले यांनी शिवीगाळ करून कानशिलात मारली व जातीवरून शिवीगाळ करून दमदाटी केली.

या फिर्यादीवरून पोलिसांनी आरोपी जनार्दन कमलाकर नवले यांच्याविरोधात भा.द.वि. कलम ३५४, ३२३, ५०४, ५०६ अनुसूचित जाती जमातीच्या कायदा कलम ३(१) (६),३ (२) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

  • ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|
अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24