Portable Washing Machine : कपडे धुण्यासाठी स्वस्तात मस्त फंडा, घरी आणा बकेटसारखी दिसणारी वॉशिंग मशीन

Portable Washing Machine : सध्या हिवाळ्याचे दिवस सुरु आहेत. या दिवसात थंडीमुळे वाचण्यासाठी उबदार कपडे अनेकजण घालतात. साहजिकच जास्त कपडे धुवावे लागतात. त्यामुळे या दिवसात काम वाचवण्यासाठी वॉशिंग मशीनची मागणी वाढते. मागणीमुळे वॉशिंग मशीनची किंमत जास्त असते.

अनेकांना महाग वॉशिंग मशीन खरेदी करणे शक्य होत नाही. परंतु, तुम्ही आता स्वस्तात वॉशिंग मशीन खरेदी करू शकता. बाजारात सध्या कमी किमतीत मिळणारी वॉशिंग मशीन उपलब्ध आहे. त्यामुळे तुम्हाला आता घासून कपडे लागणार नाहीत. ही मशीन एखाद्या बकेटसारखी दिसते.

ब्रेकिंग बातम्या मोफत वाचण्यासाठी इथे क्लिक करा

बादलीसारखी दिसणारी वॉशिंग मशीन

या वॉशिंग मशीनचे नाव ‘Hilton 3 kg सेमी-ऑटोमॅटिक टॉप लोडिंग वॉशिंग मशीन’ असे आहे. ती बादलीसारखी दिसते. नावाप्रमाणेच तिची 3KG ची क्षमता आहे.

यामध्ये एकाच वेळी 5 ते 6 कपडे धुता येतात, तसेच त्यात एक स्पिनर अटॅचमेंटसुध्दा असून त्यामुळे कपडे लवकर सुकतात. त्याचबरोबर या मशीनमध्ये ऑटोमॅटिक ऑफची सुविधा कंपनीने दिली आहे.

किंमत

ही वॉशिंग मशीन 5,999 रुपयांना मिळत आहे. महत्त्वाचे म्हणजे यावर Amazon ऑफर मिळत आहे. ऑफरमुळे तुम्ही ती 4,590 रुपयांना खरेदी करू शकता.

केवळ 10 मिनिटांमध्येच मशीन कपडे धुते, त्यामुळे पाण्याचा आणि विजेचीही बचत होते. त्याशिवाय तुम्ही ती स्थानिक बाजारातून खरेदी करू शकता. हे लक्षात घ्या की तिची रचना थोडी वेगळी असेल परंतु ती समान काम करेल.