ए चूतिया – उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 5 एप्रिल 2021 :-उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आपल्या एका व्हिडीओमुळे जोरदार चर्चेत आले आहेत. सध्या सोशल मीडियावर योगींचा एक व्हिडीओ जोरदार व्हायरल होतं आहे.

या व्हिडीओमध्ये मुख्यमंत्री एएनआय वृत्तसंस्थेच्या प्रतिनिधीशी बोलत होते. मात्र त्याचदरम्यान काही कारणांवरून चिडलेल्या आदित्यनाथ यांनी समोरील व्यक्तीला शिवीगाळ केल्याचा आरोप केला जात आहे.

व्हीडीओ पहा पुढील लिंकवर – 

योगींनी अपशब्द वापरल्याने त्यांच्यावर जोरदार हल्लाबोल करण्यात येत आहे. देशात करोना लसीकरण वेगानं सुरू आहे. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी रविवारी लसीचा पहिला डोस घेतला.

त्यानंतर ते एएनआयशी बोलत होते. प्रतिक्रिया देत असतानाच कॅमेरला हलल्याने योगी आदित्यनाथ चिडले आणि त्यांनी व्हिडीओ पत्रकाराला शिवी दिली. सेवानिवृत्त आयएएस अधिकाऱी सूर्य प्रताप सिंह यांनी हा व्हिडीओ ट्वीट करत टीका केली आहे.

‘उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा हा आहे खरा चेहरा. थोडा आवाज झाला म्हणून एएनआयच्या कॅमेरामॅनला शिवी देत आहे. असो एएनआयसोबत असंच व्हायला हवं.

देशातील सर्वात मोठी वृत्तसंस्था जेव्हा सरकारी प्रवक्त्यांपेक्षाही जास्त पुढे पुढे केल्या असं होणं साहजिक आहे. संताची भाषा ऐका,” असं सूर्य प्रताप यांनी म्हटलं आहे.+ हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर अनेक लोकांनी योगी आदित्यनाथ यांच्यावर टीका केली आहे.

या आधी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुलाखतीच्या आधी पाणी आणून देणाऱ्या कर्मचाऱ्याला अपमानास्पद पद्धतीने हाकलून दिल्याचा व्हिडीयो सोशल मिडीया वर व्हायरल झाला होता.

लोकांसमोर आपला चांगला चेहरा जावा म्हणून प्रयत्न करणारे अनेक राजकीय नेते कॅमेरामागे मात्र अशा पद्धतीने वागताना दिसतात अशी टीका समाजमाध्यमांवर होताना दिसत आहे.

  • ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|
अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24