घासाच्या पिकात मृत बिबट्याचा बछडा आढळून आला

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 31 मार्च 2021:-जिल्ह्यात पुन्हा बिबट्याने धुमाकूळ घालण्यास सुरुवात केली आहे. यातच जिल्ह्यातील उत्तरेकडील भागामध्ये बिबट्या सर्वाधिक आढळून आला आहे.

नुकतेच राहाता तालुक्यातील हनुमंतगाव येथे घासाच्या पिकात मृत बिबट्याचा बछडा आढळून आल्याने खळबळ उडाली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी कि, हनुमंतगाव येथील हनुमंतगाव सहकारी सोसायटीचे चेअरमन रामनाथ पाबळे यांच्या शेतात बिबट्याचा बछडा आढळून आला.

त्यांनी बंधू रामनाथ यांना कल्पना दिली. याबाबतची माहिती वन विभागाच्या कर्मचार्‍यांना देण्यात आली.

त्याप्रमाणे उपवनसंरक्षक रेड्डी व त्यांचे सहकारी यांनी सदर घटनेची नोंद घेत कोपरगाव वनविभागाचे श्री. सुराशे यांना घटनास्थळी पाठविले त्यांनी मृत बिबट्याचा पंचनामा करून अग्नी संस्कार केले .

बिबट्यांची टोळी हनुमंतगाव परिसरात फिरताना दिसत असून या टोळीमध्ये अन्नासाठी किंवा अस्तित्वासाठी झगडा होत असावा.

यातूनच हा बछडा वादाचा बळी ठरलेला असावा. ग्रामस्थांनी वारंवार मागणी करूनही पिंजरा लावण्याचे वन विभाग टाळीत आहे. लवकरात लवकर या भागात पिंजरा लावावा, अशी शेतकर्‍यांची मागणी आहे.

  • ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|
अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24