अहमदनगर Live24 टीम, 23 जून 2021 :- कोरगाव व श्रीरामपूर विभागाच्या पथकाने बनावट दारू निर्मिती कारखान्यावर धाड टाकली आहे.
दरम्यान या ठिकाणाहून पोलिसांनी २०० लीटर स्पिरीट,३० लीटर तयार विदेशी मद्य व १८० मिलीच्या ४४० नामांकित ब्रॅण्डच्या बनावट बाटल्या जप्त करण्यात आल्या.
याशिवाय देशी दारूच्या ३८४ भिंगरीच्या बाटल्याही मिळून आल्या. विदेशी दारूमध्ये इम्पेरियल ब्ल्यू, मॅकडोवेल्स, विस्की यांचा समावेश आहे.
तसेच दारूसाठी लागणारे कृत्रिम स्वाद पदार्थ, ५ हजार ६०० बाटल्या व पीकअप व्हॅन (एमएच ०६ बीजी ०८५२) पथकाने ताब्यात घेतले.
याप्रकरणी पोलिसांनी शहेबाज युनूस पटेल (वय २९, संजयनगर) यास ताब्यात घेतले आहे. ताब्यात घेतलेल्या आरोपीकडून त्याच्या इतर साथीदारांची माहिती घेतली जाणार आहे.
याबाबत अधिक माहिती अशी कि, श्रीरामपूर शहरालगत दत्तनगर येथून बनावट दारू तयार करण्यासाठी लागणारे २१० लीटर स्पिरीट तसेच रयासन व हातभट्टीची दारू उत्पादन शुल्कने छाप्यात ताब्यात घेतली होती.
या कारवाईत ८२ हजार २५० रुपयांचा मुद्देमाल मिळून आला होता. अतिशय संघटितरीत्या व योजनाबद्ध पद्धतीने एका कारखान्यातून बनावट दारूनिर्मितीचा हा उद्योग सुुरू होता.
ताब्यात घेतलेल्या आरोपीकडून त्याच्या इतर साथीदारांची माहिती आता घेतली जाणार आहे. अशी माहिती अधीक्षक गणेश पाटील यांनी यावेळी दिली.
कारवाईत निरीक्षक ए.बी. बनकर, एस.के. कोल्हे, बी.बी. हुलगे, ए.व्ही. पाटील, पी.बी. अहिरराव, एम.डी. कोंडे, व्ही.एम. बारवकर, एम.एस. धोका, एस.बी. भगत, के.यु. छत्रे, कुमारी घोडे, नम्रता वाघ आदी सहभागी झाले होते.