शेतात वीज कोसळल्याने शेतकऱ्याचा 2 एकर ऊस जळाला

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 22 मार्च 2021:-वादळी पावसादरम्यान वीज पडून आग लागल्याने एका शेतकऱ्याचा दोन एकर ऊस जळल्याची घटना घडली आहे.

दरम्यान हि दुर्दैवी घटना नेवासा तालुक्यातील पानेगाव येथे घडली आहे. याबाबत सविस्तर वृत्त असे की, आज सोमवारी दुपारी 4 वाजेचे सुमारास नेवासा तालुक्यातील पानेगाव येथे ढगांच्या कटकडाटासह वादळी पाऊस सुरू झाला असता शेतकरी रामदास तबाजी गागरे यांच्या शेतात उभ्या असलेल्या 3 एकर ऊसात अचानक वीज पडली.

वीज पडल्याने उभ्या ऊसाला आग लागली. शेजारील शेतकऱ्याचे गव्हाचे पिकात ट्रॅक्टरने तास टाकून नांगरट काढल्याने तीन पैकी एक एकर ऊस वाचवण्यात यश मिळाले.

मात्र या दुर्घटनेत दोन एकर ऊस पीक जाळून खाक झाला आहे. तसेच याघटनेत शेतकऱ्यांचा ऊस व गहू पिकाचे मोठे नुकसान झालेले आहे. आधीच कोरोनामुळे आर्थिक संकटात सापडलेल्या शेतकऱ्यावर आस्मानी संकट कोसळत आहे.

यामुळे बळीराजा हवालदिल होऊ लागला आहे. प्रशासनाने पंचनामा करून पीडित शेतकऱ्याला आर्थिक भरपाई द्यावी अशी मागणी होऊ लागली आहे.

  • ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|
अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24