दारूच्या नशेत तर्रर्र झाल्या बेवड्या डॉक्टरांकडून महिला डॉक्टरला शिवीगाळ

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 9  मे 2021 :-कोपरगाव शहरातील एसएसजीएम कोविड केअर सेटरमध्ये दारूचे सेवन केलेल्या 2 डॉक्टरांनी कोविड सेंटरच्या ऑक्सिजन विभागाच्या प्रमुख महिला डॉक्टरसह त्यांचे पतीस शिवीगाळ करीत मारहाणीचा प्रयत्न केला.

याबाबत अधिक माहिती अशी कि, महिला डॉ.भाग्यश्री घायतडकर घरी असताना शनिवारी रात्री दुपारच्या सुमारास वैद्यकिय अधिकारी डॉ.राजेंद्र पारखे यांनी त्यांना मोबाइलवर फोन करून एसएसजीएम कोविड सेंटरचा ऑक्सिजन संपला आहे व तेथील पेशंट मरत आहेत, असे सांगितले.

त्यावर महिला डॉक्टर यांनी त्यांचे पती डॉ.कुणाल घायतडकर कोविड सेंटरला आले. हे दोघे तेथे पोहोचल्यावर वैद्यकीय अधिकारी डॉ. राजेंद्र पारखे व समुदाय आरोग्य अधिकारी अक्षय गायकवाड यांनी महिला डॉक्टर व त्यांच्या पतीस शिवीगाळ करून मारहाण करणायचा प्रयत्न केला.

असे फिर्यादीत म्हंटले आहे. या प्रकरणी डॉ.भाग्यश्री कुणाल घायतडकर ( वय २८, रा.शारदानगर, कोपरगाव ) यांच्या फिर्यादीवरून वैद्यकीय अधिकारी डॉ.राजेंद्र भानुदास पारखे (रा. साईनगर, ता.राहाता ),

समुदाय आरोग्य अधिकारी अक्षय देवीचंद गायकवाड ( रा. कर्मवीरनगर, कोपरगाव) यांच्याविरुद्ध कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

  • ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|
अहमदनगर लाईव्ह 24