विनामास्क फिरणाऱ्यांकडून तब्बल ११ लाखांचा दंड वसूल

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 04 मार्च 2021:- कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाने केलेल्या प्रतिबंधात्मक उपाययोजनांची प्रभावी अंमलबजावणी जिल्ह्यात करण्यात येत आहे. जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली विविध यंत्रणा कार्यरत झाल्या असून, नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात येत आहे.

फेब्रुवारी महिन्यापासून रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेत प्रशासनाने ही कार्यवाही अधिक गतिमान करण्याचा निर्णय घेतला आहे. दि.२० फेब्रुवारीपासून ते दि. ३ मार्चपर्यंत मास्क न वापरणाऱ्या १० हजाराहून अधिक जणांवर दंड़ात्मक कार्यवाही करुन तब्बल ११ लाख ३६ हजार सातशे रुपयांचा दंड़ वसूल करण्यात आला असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली.

मागील महिन्यापासून जिल्ह्यातील कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत असल्याचे निदर्शनास येताच जिल्हाधिकारी डॉ. भोसले यांनी प्रतिबंधात्मक उपाययोजना लागू केल्या. रात्री अत्यावश्यक सेवा वगळता इतरांना फिरण्यास बंदी केली. सार्वजनिक ठिकाणी मास्कचा वापर, सुरक्षित अंतर आणि सॅनिटायझरचा वापर, वारंवार हात धुणे आदींबाबत त्यांनी नागरिकांना आवाहन केले. याशिवाय, गर्दी टाळण्याचेही आवाहन केले.

नियमांची कडक अंमलबजावणी करण्याच्या दृष्टीने सर्व तहसीलदार, पोलीस यंत्रणा, जिल्हा परिषद, महानगरपालिकांना निर्देश दिले. त्यानुसार जिल्ह्यात नियम मोडणाऱ्यांविरुद्ध कारवाई करण्यात येत आहे. दि.२० फेब्रुवारी ते ०३ मार्च २०२१ या कालावधीत लग्न समारंभ, हॉटेल, रेस्टॉरंट, सिनेमा हॉल, धार्मिक स्थळे आणि इतर सार्वजनिक ठिकाणे अशा ९५७ ठिकाणी तपासणी करण्यात आली.

त्यापैकी १९१ ठिकाणांवर दंडात्मक कारवाई करुन २ लाख ४ हजार नऊशे रुपयांचा दंड वसूल करण्यात आला तसेच मास्क न वापरणाऱ्या १० हजार १५०  जणांकडून ११ लाख ३६ हजार सातशे रुपयांच्या दंडाची वसुली करण्यात आली.

  • किंग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|
अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24