अहमदनगर Live24 टीम, 7 एप्रिल 2021 :-टिळक रोडवरील शक्ती मार्बल्स येथील कारखान्यातील एका गोदामाला आग लागून जवळपास 30 लाखांचे नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.
दरम्यान हि आग मोठी असल्याने तातडीने महापालिकेच्या अग्निशमन दलासह व्हीआरडी, राहुरी नगरपालिकाच्या अग्निशमन गाड्या घटनास्थळी दाखल झाल्याने रात्री उशिरा आग आटोक्यात आली.
सविस्तर वृत्त असे कि, टिळक रोडवरील या गोडाऊन पूर्णपणे लोखंडी पत्र्याने बंदिस्त आहे. त्यामुळे आग विझविताना अडचणी येत होत्या. दरम्यान आग लागलेल्या पत्र्याचे गोदाम फोडण्यासाठी अग्निशामक दलाने शेवटी जेसीबीचा वापर केला.
रसायने आणि फॅब्रिकेशन जळाल्यामुळे परिसरामध्ये धुराचे लोट पसरले होते. या कारखान्यात मोठ्या प्रमाणामध्ये प्लायवूड आणि इतर लाकडी साहित्य आहे. आग लवकर लक्षात आल्याने स्थानिक नागरिकांनी धावपळ केली आणि पुढील मोठा अनर्थ टळला.
आग नेमकी कशामुळे लागली हे कळू शकले नाही. सुदैवाने यामध्ये कोणतीही जीवित हानी झाली नाही. या आगीत सुमारे 30 लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.