आज पहाटेच्या सुमारास भिंगार मध्ये शुक्रवार बाजार येथे टपऱ्यानां आग लावण्यात आली. त्यामुळे काही काळ भिंगारमध्ये तनावपूर्वक परिस्थिती निर्माण झाली होती.
याबाबत माहिती समजताच शिवसेनेच्या पदाधिकारी स्मिता अष्टेकर यांनी घटनास्थळी धाव घेतली व आरोपींवर गुन्हा दाखल करून तात्काळ अटक करण्याची मागणी त्यांनी केली.
दरम्यान पोलीस ठाण्यात आरोपी नामे प्रमोद फुलारी उर्फ शक्ती रा. माळीगल्ली, रोकडे पुर्ण नाव माहीत नाही यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दरम्यान परिस्थितीची गंभीरता पाहता तात्काळ घटनास्थळी पोलिस ठाण्याचा फौजफाटा दाखल झाला. याप्रकरणी भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यांमध्ये अतुल गुलदगड यांनी फिर्याद नोंदवली.