जिल्ह्यातील या तालुक्यात चार दिवसांचा लॉकडाऊन जाहीर

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 19 मार्च 2021:-जिल्ह्यात कोरोनाचा फैलाव मोठ्या प्रमाणावर वाढला आहे. दिवसेंदिवस वाढत्या कोरोनाबाधितांच्या आकडेवारीमुळे प्रशासन देखील सतर्क झाले आहे.

यातच गेल्या पंधरा दिवसांपासून राहाता तालुक्यात मोठ्या संख्येने करोना बाधित रुग्ण सापडत आहे. राहाता तालुक्यातील लोणी बुद्रुक व खुर्द गावात गेल्या काही दिवसात करोना रुग्णांची चिंताजनक वाढ झाली आहे.

करोना रुग्णांची वाढ लक्षात घेऊन राहात्याचे तहसीलदार, गट विकास अधिकारी, आरोग्य अधिकारी, ग्रामपंचायत पदाधिकारी आणि ग्रामस्थांची दोन्ही गावात स्वतंत्र बैठक आज झाली.

या बैठकीत येत्या रविवार दि.२१ मार्च पासून बुधवार दि.२४ पर्यंत कडकडीत बंद (लॉकडाऊन) करण्याचा निर्णय घेण्यात आला.

फक्त मेडिकल स्टोअर सुरु राहतील व सकाळी आणि संध्याकाळ मर्यादित वेळेत दूध विक्री होईल. इतर सर्व व्यवहार बंद राहणार आहेत. आज आणि उद्या नागरिकांनी करोना नियमांचे पालन करीत अत्यावश्यक वस्तूंची खरेदी करावी

असे आवाहन दोन्ही ग्रामपंचायतींनी केले आहे. लॉकडाऊन काळात अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर न पडण्याचे आवाहनही करण्यात आले आहे.

  • ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|
अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24