POCO C55 : स्वस्तात नवीन स्मार्टफोन खरेदी करण्याचे स्वप्न पाहणाऱ्यांसाठी एक सुवर्णसंधी आहे. कारण आता खूप स्वस्तात त्यांना स्मार्टफोन विकत घेता येणार आहे. दिग्ग्ज टेक कंपनी पोकोच्या Poco C55 या फोनवर ही संधी मिळत आहे.
तुम्ही आता 299 मध्ये फोन घरी आणू शकता. कंपनीचा हा एंट्री लेव्हल स्मार्टफोन आहे. काही दिवसांपूर्वी तो लाँच झाला होता. त्याची मूळ किंमत 10 हजार रुपयांपेक्षा कमी आहे. परंतु, यावर ऑफर मिळत आहे. त्यामुळे तुम्ही हा स्मार्टफोन फक्त 299 मध्ये खरेदी करू शकता.
POCO C55 किंमत
कंपनीने Poco C55 4GB + 64GB आणि 6GB + 128GB चे दोन प्रकार भारतात लॉन्च केले आहेत. याच्या पहिल्या व्हेरिएंटची किंमत 8,499 रुपये तर दुसऱ्या व्हेरिएंटची किंमत 10,999 रुपये आहे. जर तुम्हाला हा फोन विकत घयायचा असेल तर तो तुम्ही फॉरेस्ट ग्रीन, कूल ब्लू आणि पॉवर ब्लॅक कलर पर्यायात विकत घेऊ शकता.
मिळत आहे शानदार ऑफर
Poco C55 पहिल्या सेल दरम्यान 500 रुपयांच्या फ्लॅट डिस्काउंटसह विक्री केली जात आहे. डिस्काउंटमुळे या फोनची किंमत कमी होऊ शकते. जर या फोनच्या ऑफरबद्दल बोलायचे झाले तर तुम्ही SBI, HDFC आणि ICICI डेबिट किंवा क्रेडिट कार्ड वापरून 1,000 रुपयांपर्यंत सूट घेऊ शकतात. Flipkart वर हा फोन खरेदी करण्यासाठी Flipkart Axis Bank कार्ड वापरून तुम्हाला 5 टक्के सूट मिळत आहे.
फक्त 299 रुपयांमध्ये खरेदी करता येणार
खरं तर, फोन फ्लिपकार्टवर बँकेसह इतर ऑफरसह सूचीबद्ध केला गेला आहे. जर तुम्ही EMI पर्याय निवडला तर, तुम्ही प्रत्येक महिन्याला 299 रुपयांचा हप्ता भरून Poco C55 विकत घेऊ शकता.
बजेट फ्रेंडली स्मार्टफोन
या महिन्यात अनेक फोन लॉन्च झाले आहेत, ज्यांची किंमत 10 हजारांपेक्षा कमी आहे. जर तुम्हाला हवे असेल तर, तुम्ही आता iPhone सारखा दिसणारा Lava Yuva 2 Pro स्मार्टफोन विकत घेऊ शकता. ज्याची किंमत 7,999 रुपये इतकी आहे, जी कंपनीच्या अधिकृत वेबसाइट आणि प्रमुख रिटेल स्टोअरवर उपलब्ध आहे.
इतकेच नाही तर तुम्ही Infinix Smart 7 देखील विकत घेऊ शकता, जे 10,000 रुपयांपेक्षा कमी किमतीत खरेदी करू शकता, ज्याची किंमत 7,299 रुपये आहे. तसेच मोटोरोला या कंपनीचा Moto E13 10 हजारांपेक्षा कमी रेंजमध्ये लॉन्च झाला होता. Motorola Moto E13 ची 2GB + 64GB व्हेरिएंटची किंमत 6,999 रुपये आणि 4GB + 64GB व्हेरिएंटसाठी 7,999 रुपये इतकी आहे.