अहमदनगर Live24 टी म, 22 सप्टेंबर 2021 :- राज्यातील पोलीस अधिकारी व कर्मचार्यांची विधानसभा सार्वत्रिक निवडणुका 2019 च्या कामासाठी नियुक्त करण्यात आली होती.
या पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांना या इलेक्शन ड्युटीचे मानधनापोटी 26 कोटी 61 लाख 41 हजार 686 रुपयांची रक्कम वितरीत करण्यास शासनाने मंजुरी दिली आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी कि, ज्या पोलीस अधिकारी व कर्मचार्यांनी एक महिन्यापेक्षा म्हणजे 30 दिवसांपेक्षा कमी दिवस निवडणुकीचे काम केले असेल त्यांना, जेवढे दिवस त्यांनी काम केले असेल
तेवढ्या दिवसाचे मानधन देण्यात येणार आहे. ज्यांनी एक महिन्यापेक्षा जास्त दिवस निवडणुकीचे काम केले असेल त्यांना कमाल एक महिन्याचे वेतन (मूळ वेतन) देण्यात येणार आहे.
पोलीस महासंचालक ते सहाय्यक आयुक्तांपर्यंत तर पोलीस निरीक्षक ते पोलीस शिपाई तसेच लिपीक यांना हे मानधन मिळणार आहे.