अहमदनगर Live24 टीम, 28 जून 2021 :- कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होऊ लागल्याने राज्यासह अनेक जिल्ह्यांमध्ये अनलॉक पूर्णपणे करण्यात आला होता.
यामुळे नागरिकांसह व्यवसायीकांना दिलासा मिळाला व बाजारपेठ खुली झाल्या होत्या. मात्र आता पुन्हा एकदा कोरोनाचा वाढता प्रादुभाव पाहता प्रशासनाने निर्बध काहीसे कठोर केले आहे. मात्र याचा उलटाच परिणाम रविवारी पाहायला मिळाला.
नागरिकांनी बाजारपेठेत एकच मोठी गर्दी केल्याचे चित्र रविवारी पाहायला मिळाले. नुकतेच राज्यातील दोन-तीन जिल्हे वगळता सर्वच जिल्हे निर्बंध स्तर-३ (लेवल-३) मध्ये समाविष्ट करण्यात आले आहेत.
त्यामुळे या स्तरातील नियमांप्रमाणे सकाळी ७ ते दुपारी ४ या वेळेत दुकाने आणि सायंकाळी पाचनंतर संचारबंदी लागू करण्याचा आदेश राज्य सरकारने दिला. दरम्यान नगर जिल्हा देखील लेव्हल तीनमध्ये आहे.
यामुळे नगरमध्ये देखील निर्बंध लागू होणार आहे. या नवीन आदेशाप्रमाणे रविवारी वीकेंड लॉकडाऊन झाला असता. मात्र, निर्बंध वाढत असल्याने आणि रविवारच्या सुटीचा फायदा घेत नागरिकांनी बाजारात खरेदीसाठी गर्दी केली.
रविवारी सायंकाळी पाचनंतरही नगर शहरातील कापड बाजारात चागंलीच गर्दी पहायला मिळाली. रस्त्यावरही वाहनांची वर्दळ होती. भाजी बाजार, कापड बाजार, नवी पेठ, चितळे रोडवरही नागरिक गर्दी करून होते.
अनेकांनी दुुपारी चार वाजताच दुकाने बंद केली. सायंकाळी पाचनंतरही दुकाने उघडी असल्याने नागरिकांनीही बाजारात धाव घेतली.