शिकारीच्या शोधार्थ असलेला बिबट्या पडला विहिरीत

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 20 ऑगस्ट 2021 :-  शिकारीचे शोधात बाहेर पडलेला बिबट्या हा अंदाज न आल्याने बिबट्या एका शेतकऱ्याच्या विहिरीमध्ये पडला होता. सकाळी संबंधित शेतकऱ्याने विहिरीत डोकावून पाहिले असता त्यांना हे चित्र दिसून आले.

त्यांनी तत्काळ गावातील सामाजिक कार्यकर्ते अशोक भुसाळ यांना फोन करुन विहिरीत बिबट्या पडल्याची माहिती दिली. अशोक भुसाळ यांनी तत्काळ वनविभागाचे कर्मचारी अशोक गिते यांना घटनेची माहिती देऊन भुसाळ स्वतः घटनास्थळी दाखल झाले.

या घटनेची माहिती मिळताच उपविभागीय वनअधिकारी संदीप पाटील यांचे मार्गदर्शनाखाली वनक्षेत्रपाल एस. एस. माळी, वनपाल पी. जे. पुंड, वनरक्षक एस. एम. पारधी, पडवळे, वाहन चालक बोऱ्हाडे, अशोक गीते, डेंगळे आदी कर्मचाऱ्यांनी घटनास्थळाकडे धाव घेतली.

बिबट्याला विहिरीतून बाहेर काढण्यासाठी अथक प्रयत्न करण्यात आले . अखेर या बिबट्याला सुखरूप बाहेर काढण्यात आले. हा अडीच ते तीन वर्षाचा मादी बिबट्या असल्याची माहिती वनविभागाने देऊन त्याला पुढील कार्यवाहीसाठी निंबाळे रोपवाटिकेत हलवले आहे.

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24