दबा धरून बसलेल्या बिबट्याने दुचाकीस्वारावर केला हल्ला….

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 31 मार्च 2021:-जिल्ह्यात पुन्हा एकदा बिबट्याची दहशत वाढताना दिसून येत आहे. नुकतेच चांदबीबी महाल परिसरात बिबट्या आढळून आला आहे.

तर नुकतेच जिल्ह्यातील उत्तरेकडीन भागांमध्ये देखील बिबट्याचे दर्शन होऊ लागले आहे. नुकतेच कोपरगाव तालुक्यातील एका व्यक्तीवर बिबट्याने हल्ला केला या हल्ल्यात त्यांचा मृत्यू झाला आहे.

दरम्यान हा प्रकार नाशिक जिल्ह्यातील सोमठाणा गावाजवळ मेंढी नाल्याजवळ घडला आहे. याबाबत अधिक माहिती अशी कि, कोपरगाव तालुक्यातील मंजूर येथील सुधाकर तुकाराम कदम हे नाशिक येथे रात्री मुक्कामी थांबून सकाळी मोटारसायकलवर घरी येत असताना

सोमठाणा जवळील मेंढी नाल्यामध्ये बिबट्याने अचानक मोटरसायकलवर झेप घेत पायावर हल्ला केला. या हल्ल्यामुळे घाबरून गेलेले सुधाकर कदम मोटारसायकल वरून फेकले गेले.

त्यात त्यांच्या डोक्याला जबरदस्त मार लागल्यामुळे त्या परिस्थितीमध्ये त्यांना नाशिक येथे हलविण्यात आले. आठ दिवस दवाखान्यात उपचार घेऊनही ते शुद्धीवर येऊ शकले नाही. उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत आठ दिवसांनी मालवली.

  • ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|
अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24