राशीनमध्ये दुकान फोडणाऱ्या एकास पोलिसांनी बीडमध्ये जाऊन बेड्या ठोकल्या

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम, 11 सप्टेंबर 2021 :-  कर्जत तालुक्यातील राशीनमध्ये राशीन ते करमाळा रोडवरील एक दुकान अज्ञात तीन चोरट्यांनी फोडले होते. व लाखोंचा माल लंपास केला होता.

याप्रकरणी पोलिसांनी एकाला अटक केली आहे तर या प्रकरणातील दोन आरोपी फरार आहे. स्टेशनमधील एक टिम तयार केली. त्यामध्ये पोलीस उपनिरीक्षक भगवान शिरसाठ, तुळशीदास सातपुते,

पोलीस अंमलदार सागर म्हेत्रे, गणेश ठोंबरे, भाऊसाहेब काळे, संपत शिंदे, गणेश भागडे यांचा समावेश होता. याबाबत अधिक माहिती अशी कि, याप्रकरणी कर्जत पोलीस स्टेशनमध्ये राहुल आबासाहेब जांभळकर,

वय -३० वर्षे, रा. राशीन यांनी गुन्हा दाखल केला होता. हे आरोपी पकडण्यासाठी पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांनी पोलीस पथक तयार केले होते. हे आरोपी चोरीकरून बीडकडे गेल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले.

पोलिसांनी बीड येथे जावुन बीडमधील मोमीनपुरा भागातील सराईत गुन्हेगार सोयब कमरोउद्दीन शेख, वय २६ वर्षे, फारुख शेख ( फरार ) व सलमान शेख ( फरार )

यांना गुन्ह्यात निष्पन्न करून त्यांच्यापैकी सोयब कमरोद्दीन शेख याला अटक केले. त्याने गुन्ह्यात वापरलेली स्विफ्ट गाडी व ७३९५० रुपये किमतीची १४७ किलो कॉपर वायर जप्त करण्यात आली. दरम्यान या गुन्ह्यातील आरोपीवर बीडमध्ये चोरीचे वेगवेगळे गुन्हे दाखल आहेत.