नदीपात्रात आढळून आला पुरुषाचा मृतदेह

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 18 मार्च 2021:- जिल्ह्यात हल्ली आत्महत्या, खून आदी प्रकारामुळे खळबळ उडाली आहे. यातच संगमनेर तालुक्यातील घारगाव लगत असणार्‍या मुळा नदीपात्रात 42 वर्षीय इसमाचा मृतदेहआढळून आला आहे.

याबाबत अधिक समजलेली माहिती अशी कि, सदर मृतदेह हा शांताराम तात्याभाऊ शिंदे (रा.नांदूर खंदरमाळ) या व्यक्तीचा आहे. नदीपात्रात अज्ञात इसमाचा मृतदेह तंरगत असल्याचे नागरिकांच्या लक्षात आले.

त्यांनी घारगाव पोलिसांना ही माहिती दिली. त्यानुसार पोलीस निरीक्षक सुनील पाटील यांनी आपल्या कर्मचार्‍यांसह घटनास्थळी भेट दिली.

ग्रामस्थांच्या मदतीने हा मृतदेह पाण्यातून बाहेर काढण्यात आला. शवविच्छेदनानंतर हा मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. दरम्यान जिल्ह्यात सध्या या घटनांना प्रचंड वाढल्या आहेत.

अनेक घटना घडल्या नंतर पोलिसांचा तपासानंतर अनेक धक्कादायक गोष्टी देखील समोर येत आहे. आत्महत्या वाटणार्या घटना कधीकधी घातपात झाल्याच्या पोलीस तपासातून स्पष्ठ होतात.

  • ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|
अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24