अहमदनगर Live24 टीम, 11 फेब्रुवारी 2021:- जिल्ह्यातील नागरिकांसाठी जिव्हाळ्याचा व महत्त्वाचा प्रश्न असलेला पुणे-नगर-शिर्डी शटल रेल्वे सेवा सुरु होण्यासाठी अनेक स्वयंसेवी संघटना, राजकीय पक्ष व नेते मंडळी प्रयत्नशील आहे.
पीपल्स हेल्पलाईन, भारतीय जनसंसद व मेरे देश मे मेरा अपना घर आंदोलनाने ही रेल्वेसेवा सुरु होण्यासाठी आंदोलनाचा इशारा दिला असताना रेल्वे प्रशासनाने शुक्रवार दि.12 फेब्रुवारी रोजी सकाळी 11 वाजता अहमदनगर रेल्वे स्थानक येथे बैठक बोलवली असल्याची माहिती अॅड. कारभारी गवळी यांनी दिली.
अहमदनगर रेल्वे स्थानक येथील स्टेशन मॅनेजर तोमर यांनी शटल रेल्वेसाठी प्रयत्नशील असणार्या व्यक्तींशी संपर्क साधून बैठकिला बोलावले आहे.
या बैठकिसाठी रेल्वे विभागाचे अधिकारी यांच्यासह अॅड. गवळी, हरजितसिंह वधवा, अर्शद शेख, सुहास मुळे आदींसह स्वयंसेवी संघटनेचे पदाधिकारी, विविध राजकीय पक्षाचे पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत.