अहमदनगर Live24 टीम, 5 जुलै 2021 :- भारताचा माजी कर्णधार महेंद्र सिंह धोनी याच्या लग्नाचा रविवारी 11 वा वाढदिवस होता. यानिमित्ताने महेंद्रसिंह धोनीने पत्नी साक्षीला एक शानदार विंटेज कार गिफ्ट दिली आहे.
साक्षीने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर कारचा फोटो पोस्ट करत ही माहिती दिली. तिने इन्स्टाग्राम स्टोरीवरही कारचा फोटो ठेवला होता. धोनीला थँक्यू म्हणत साक्षीने ही पोस्ट केली होती.
ही कार जुन्या काळातील असल्यामुळे नेमकी कंपनी आणि मॉडेल अजून स्पष्ट झालेले नाही. धोनी आणि साक्षी यांनी ४ जुलै २०१० साली लग्न केलं. त्यांना जिवा नावाची मुलगी आहे. साक्षी सोशल मीडियावर सतत पोस्ट टाकत असते.
त्यातुलनेत धोनी सोशल मीडियापासून लांबच राहतो. साक्षीच्या इंस्टा पोस्टवरून चाहत्यांना धोनीचे अपडेट्स मिळतात. सध्या धोनी त्याच्या कुटुंबीयांसह शिमला येथे फिरायला गेला आहे आणि सोशल मीडियावर तेथील फोटोही व्हायरल झाले होते.
२०२० मध्ये १५ ऑगस्टला धोनीनं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली. त्यामुळे तो सध्या आयपीएलमध्ये खेळताना चाहत्यांना दिसत आहे.
कोरोना व्हायरसमुळे आयपीएल २०२१चे सामने स्थगित करण्यात आले होते आणि आता उर्वरित सामने सप्टेंबरमध्ये यूएईत खेळवण्यात येणार आहेत.