अहमदनगर Live24 टीम, 25 जून 2021 :- जिल्हा प्रशासनाने वटपौर्णिमेपासून सुरु केलेल्या एक व्यक्ती, एक झाड अभियानात सहभाग नोंदवून पोलिस मित्र फोर्स (महाराष्ट्र राज्य) च्या युवक-युवतींनी घराच्या अंगणात एक झाड लाऊन वटपौर्णिमा साजरी केली.
संघटनेच्या वतीने पर्यावरण संवर्धनासाठी विविध उपक्रम सुरु असून, जिल्हाधिकारी यांनी केलेल्या आवहानाला प्रतिसाद देत हा उपक्रम राबविण्यात आला.
घराच्या अंगणात राजरत्न (प्रफुल्ल) व प्रांजली लोखंडे या चिमुकल्यांच्या हस्ते वृक्षरोपण करुन या अभियाचे प्रारंभ करण्यात आले.
यावेळी संघटनेचे अध्यक्ष प्रा. पंकज लोखंडे, राज्य अध्यक्ष अनिल गायकवाड, राज्य महासचिव सदीप ठोबे, जिल्हा अध्यक्ष शरद महापुरे, संतोष वाघ, राजेद्र लोखंडे आदी उपस्थित होते.
प्रा. पंकज लोखंडे म्हणाले की, वटपौर्णिमेला झाडे लाऊन खर्या अर्थाने निसर्गाची पूजा करण्याची गरज आहे. वृक्ष तोड झाल्याने पर्यावरणाचे समतोल ढासळले आहे.
नैसर्गिक संकटांना तोंड द्यावे लागत असताना, कोरोना काळात निर्माण झालेल्या ऑक्सिजनच्या आवश्यकतेमुळे झाडांचे महत्त्व सर्वांना कळले.
भविष्यातील मोठे संकट टाळण्यासाठी पर्यावरण संवर्धन करण्याची गरज असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.
पोलिस मित्र फोर्सच्या सदस्यांनी आपल्या कुटुंबीयांसह घराच्या अंगणात ऑक्सिजन देणारी देशी झाडे लाऊन, त्याचे संवर्धन करण्याची जबाबदारी स्विकारली आहे.
या अभियानात डॉ.अमित महांडुळे, राज्य मार्गदर्शक रमेश आल्हाट, मुख्याध्यापक पॉल भिगारदीवे, नाना कापडे, विजय दुबे, नितिन साठे, ऋषीकेश थोरात, प्रशांत गाधी, वैभव आव्हाड, सजोत मकासरे, सॅमसन मकासरे,
सचिन साळवे, अमित लोखंडे, ऋषीकेश गोपाळघरे, रवीकुमार वाबळे, अमोल हळदे, उमेश वाळके, इरफारन पठाण, राजू भाकरे, जावेद सय्यद, जावेद शेख, निलेश परब, ओंकार पाटसकर, सुरज दुबे, पोर्णिमा भाकरे, सायली भाकरे,
दिव्या रोकडे, रेबिका भाकरे, ऋतूजा सरोदे, अर्चना गडधे, साक्षी जाधव, धन्यता भाकरे, प्रशांत लोखंडे, कोमल भाकरे, जॉनसन लोखंडे, प्रविण गायकवाड, मनोज काळे, शंकर भुसारी, उदय खळेकर यांनी सहभाग नोंदवला.