भरधाव वेगातील अज्ञात वाहनाच्या धडकेत पोलिसाचा मृत्यू…? पांढरीपूल येथे घडली घटना

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Maharashtra News:भरधाव वेगाने जात असलेल्या एका अज्ञात वाहनाने समोर चाललेल्या मोटारसायकलला पाठीमागून दिलेल्या जोरदार धडकेत, या मोटारसायकल वरील पोलिसाचा गंभीर जखमी होऊन उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची घटना नगर- औरंगाबाद महामार्गावर घडली.

अनंथा बंडू गायकवाड असे या अपघातात ठार झालेल्या पोलिस कर्मचाऱ्याचे नाव आहे. याबाबत राजेंद्र सुभाष दाणी ( रा. वांजोळी) यांनी सोनई पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. रविवारी सायंकाळी अनंथा बंडू गायकवाड (वय ४७. रा. धोत्रे ता. पारनेर) हे औरंगाबाद- नगर हायवे रोडवर नगरच्या दिशेने रोडच्या डाव्या बाजूने जात होते.

ते पांढरीपुल शिवारातील हॉटेल मातोश्रीसमोर आले असता त्यांच्या पाठीमागून आलेल्या कुठल्यातरी भरधाव वेगातील अज्ञात वाहनाने गायकवाड यांच्या मोटरसायकलला पाठीमागून जोराची धडक देऊन पळून गेला. या अपघातात गायकवाड हे गंभीर जखमी झाले.

याबाबत माहिती समजताच सोनईचे सहाय्यक पोलीस निरीक्षक माणिक चौधरी व कर्मचाऱ्यांनी त्यांना अहमदनगर येथे खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले असता तेथील डॉक्टरांनी त्यांचा मृत्यू झाल्याचे सांगितले. गायकवाड यांच्या पाश्चात पत्नी, एक मुलगा व दोन मुलीअसा परिवार आहे.