अहमदनगर Live24 टीम, 10 जून 2021 :- पारनेर तालुक्यात व्यापारी असोसिएशन व प्रशासन यांची बैठक होऊन दर बुधवारी व शनिवारी जनता कर्फ्यू पाळला जाणार असून दुकाने बंद ठेवण्याचा निर्णय झाला आहे.
तसेच पारनेर शहरामध्ये प्रांताधिकारी तहसीलदार व नगरपंचायत प्रशासन यांच्याकडून कोरोना निर्बंध न पाळणाऱ्या व्यवसायिक दुकानदार व नागरिकांवर कारवाई करण्यात आली आहे.
सध्या कोरोनाची दुसरी लाट ओसरली असून त्यामुळे लॉकडाऊनचे निर्बंध शिथिल करण्यात आले आहेत. मात्र मोठ्या प्रमाणात नागरिक गर्दी करत आहेत.
त्यामुळे परत कोरोनाचा संसर्ग वाढू नये यासाठी स्थानिक पातळीवर नागरिक निर्णय घेत आहेत. त्यानुसार राहाता तालुक्यात जनता कर्फ्यू पाळण्याचा निर्णय झाला होता.
आता पारनेर तालुक्यात आठवड्यातून दोन दिवस अत्यावश्यक सेवा वगळता सर्व दुकाने बंद ठेवून कडकडीत जनता कर्फ्यू पाळण्याचा निर्णय झाला आहे.
कोरोना निर्बंध खुले झाल्यानंतर पारनेर शहरात अनेक दुकानदारांकडून सोशल डिस्टन्स, मास्क इत्यादीचे पालन होत नव्हते.
काही दुकानांमध्ये नागरिक गर्दी करत होते. त्या ठिकाणी प्रांताधिकारी सुधाकर भोसले, तहसीलदार ज्योती देवरे, नगरपंचायत मुख्य अधिकारी डॉ. सुनिता कुमावत,
गटविकास अधिकारी किशोर माने यांच्या संयुक्त पथकाने कारवाई करत पारनेर शहरातील तीन दुकाने सात दिवसासाठी सील केली.