अहमदनगर Live24 टीम, 28 जून 2021 :- नगर जिल्हा गुन्हेगारीचा रेकॉर्ड तोडतो कि काय अशीच परिस्थिती निर्माण झाली आहे. दररोज होणाऱ्या चोऱ्यांचे प्रमाण वादळे आहे.
रात्रीच्या अंधारात होणाऱ्या चोऱ्या आता दिवसाढवळ्या होऊ लागल्या आहेत.. यामुळे आता नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
यातच राहाता शहरातील कायम गजबजलेल्या विरभद्र मंदीर परिसरात दिवसा ढवळ्या उघड्या भांड्याच्या दुकानातून सव्वा लाख रुपयांची चोरी झाल्याची घटना आज दुपारी दोन वाजेच्या सुमारास घडली आहे.
दरम्यान याप्रकरणी सीमा कुंभकर्ण (वय ४७ रा. राहाता) यांनी राहाता पोलिसात फिर्याद दिली आहे. याबाबत अधिक माहिती अशी कि, माझ्या मालकीचे राहाता विरभद्र मंदीरा समोरील बाजार तळावर असलेले
साई स्टील हे भांड्याचे दुकानात गि-हाईक करीत असतांना काही अनओळखी इसम दुपारी दोन वाजेच्या सुमारास भांडे खरेदी करण्याच्या बहाण्याने दुकानात आले होते.
मला भांडे दाखवण्यात गुंतवून माझ्या उघड्या गल्याच्या ड्रावर मधील रोख ८४ हजार रुपये व त्यात ठेवलेले
दिड तोळ्याचे गंठन किमंत ४५ हजार रुपये असा १ लाख २९ हजार रुपयाचा ऐवज चोरुन नेला. फिर्यादी वरुन राहाता पोलिसांनी अज्ञात चोरट्या विरोधात चोरीचा गुन्हा दाखल केला आहे.