अहमदनगर Live24 टीम, 2 जून 2021 :- कोरोनाची दुसऱ्या लाटेचा महाप्रकोप पाहाता जिल्हा प्रशासनाने येणाऱ्या तिसर्या लाटेच्या पार्शवभूमीवर जिल्ह्यात उपाययोजना राबवण्यास सुरुवात केली आहे.
दरम्यान कोरोनाची तिसरी लाट हि लहान मुलांसाठी अत्यंत घातक ठरणार असल्याने याबाबत प्रतिबंधामतक उपाययोजना सुरु करण्याच्या दृष्टीने प्रशासन पाऊले टाकत आहे.
नुकतेच जिल्ह्यात एप्रिल आणि मे महिन्यांत करोना बाधित आढळून आलेल्या रुग्णामध्ये 18 वर्षांखालील मुलांचे प्रमाण 10 टक्क्यांच्या पुढे असल्याचे समोर आले आहे.
यामुळे टास्क फोर्सच्या सल्ल्यानुसार जिल्हा रुग्णालयातील कोविड हॉस्पिटलमध्ये 19 वर्षांखालील मुलांसाठी 100 बेडचा स्वतंत्र विभागासह 15 बेडचा आयसीयू सुरू करण्यात येणार आहे. यासह ग्रामीण रुग्णालयात अशी व्यस्था करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी दिली.
जिल्ह्यात साधारणपणे मे महिन्यांत 91 हजार करोना बाधित रुग्ण सापडलेले आहेत. यात 9 हजारांहून अधिक 18 वर्षाखालील मुलांचा समावेश आहे. त्यांची टक्केवारी 11. 5 टक्के असून एप्रिल महिन्यांत ही टक्केवारी 10 टक्के होती.
याबाबतचा आणखी अभ्यास प्रशासन आणि आरोग्य विभागाकडून सुरू आहे. मात्र, जिल्ह्यात 18 वर्षाखालील मुलांना करोनाचा संसर्ग वाढत असल्याचे समोर आले आहे.
यामुळे टास्क फोर्सच्या सल्ल्यानूसार जिल्हा रुग्णालयातील कोविड हॉस्पिटलमध्ये 19 वर्षाखालील मुलांसाठी 100 बेडचा स्वतंत्र विभागासह 15 बेडचा आयसीयूसह प्रत्येक ग्रामीण रुग्णालय,
उपजिल्हा रुग्णालय या ठिकाणी 18 वर्षाखालील मुलांवर करोना उपचार करण्यासाठी स्वतंत्र विभाग कार्यान्वित करण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकारी डॉ. भोसले यांनी सांगितले.