अहमदनगर Live24 टीम, 18 फेब्रुवारी 2021:- मध्य रेल्वेने प्रवाशांच्या सुविधांसाठी विशेष गाड्या सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. 11 मार्चपासून दादर (टी)- शिर्डी- दादर (टी) व शिर्डी- दादर या विशेष एक्सप्रेस धावणार आहेत.
सदर गाडीचे कोचेस आरक्षित असल्याची माहिती मध्य रेल्वे विभागाने दिली आहे. असे असणार रेल्वेचे विशेष गाड्यांचे वेळापत्रक दादर- शिर्डी एक्सप्रेस 11 मार्चपासून दादर स्थानकावरून आठवड्यातून प्रत्येक मंगळवार, बुधवार, गुरूवार आणि शनिवारी रात्री 11.45 वाजता सुटेल ती कल्याण,
चिंचवड, पुणे, नगर, बेलापूर मार्गे दुसर्या दिवशी सकाळी 9.35 वाजता शिर्डीत दाखल होईल. दुसरी गाडी शिर्डी-दादर 12 मार्च पासून धावणार आहे.
शिर्डी स्थानकावरून आठवड्यातील प्रत्येक बुधवार, गुरूवार, शुक्रवार आणि रविवार रात्री 8.10 वाजता ही गाडी सुटणार असून ती बेलापूर- नगर मार्गे पुणे, चिंचवड, उरलीकांचन, कल्याण मार्गे दुसर्या दिवशी पहाटे 5.37 वाजता दादरला दाखल होईल. रेल्वे गाडी व स्थानकावर कोविड संदर्भातील राज्य व केंद्र सरकाच्या नियमांचे पालन करण्याच्या सूचना करण्यात आल्या आहे.