Volkswagen Polo : मार्केटमध्ये पुनरागमन करत आहे ही जबरदस्त कार; जाणून घ्या सविस्तर !

Published by
Sonali Shelar

Volkswagen Polo : ऑटो मार्केटमध्ये सध्या सर्व जुन्या कार नवीन अवतारात येत आहे. अशातच फोक्सवॅगनची सर्वात लोकप्रिय एसयूव्ही पोलो देखील नवीन अवतारात मार्केटमध्ये येण्याची शक्यता आहे. एकेकाळी फोक्सवॅगनच्या या एसयूव्हीने भारतीय बाजारपेठेत खूप धमाल केली होती. मात्र काही कारणांमुळे ही कार देशात बंद करण्यात आली आहे. पण आता ती पुन्हा मार्केटमध्ये एंट्री करू शकते.

एवढेच नाही तर यावेळी या कारला नवीन डिझाईन तसेच दमदार इंजिन दिले जाणार आहे. तसेच कंपनीची ही नवीन कार २५ किमी पेक्षा जास्त मायलेज देण्यास सक्षम असेल असा विश्वास आहे. मिळालेल्या माहितीनुसार कंपनी 2024 च्या अखेरीस ही कार बाजारात आणली जाईल.

फोक्सवॅगन पोलो इंजिन

कंपनी ही कार नवीन इंजिनसह बाजारात आणणार आहे. यामध्ये कंपनी 1.2 लीटर पेट्रोल इंजिन देऊ शकते. तसेच, असे मानले जाते की कंपनी या कारमध्ये सौम्य आणि मजबूत हायब्रिड इंजिन देखील देईल.

फोक्सवॅगन पोलो वैशिष्ट्ये

याच्या वैशिष्ट्यांबद्दल बोलायचे झाल्यास, कंपनी नवीन पोलोमध्ये क्रूझ कंट्रोल, मोठी टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम, रियर पार्किंग सेन्सर कॅमेरा, एअरबॅग्ज यांसारखे अनेक अपडेट फीचर्स देऊ शकते. यासोबतच यात ABS सोबत EBD देखील दिसू शकतो. फॉक्सवॅगन या आलिशान कारचा इलेक्ट्रिक अवतारही काही वर्षांत बाजारात आणू शकते.

फोक्सवॅगन पोलो किंमत

तुमच्या माहितीसाठी, कंपनी आपली नवीन पोलो बाजारात 10 ते 14 लाख रुपयांच्या प्रारंभिक एक्स-शोरूम किंमतीत लॉन्च करू शकते. तसेच, लॉन्च झाल्यानंतर ही कार ह्युंदाई i20 आणि मारुती सुझुकी बलेनो सारख्या वाहनांना थेट टक्कर देऊ शकते.

Sonali Shelar