अहमदनगर Live24 टीम, 17 जून 2021 :- जिल्ह्यातील गेल्या काही दिवसांपासून चोरी, लुटमारी आदी घटनांमध्ये वाढ झालेली पाहायला मिळते आहे. कायदा व सुव्यवस्थेचा धाक चोरट्यांच्या मनात राहिला नसल्याने शहरासह जिल्ह्यात खुलेआम दिवसाढवळ्या चोऱ्यांचे प्रमाण वाढले आहे.
नागरिकांच्या मनात दहशत माजविणाऱ्या चोरट्यांना गजाआड करण्यास पोलीस प्रशासनाला अपयश येत असल्याचे चित्र सध्या शहरात दिसून येत आहे. नुकतेच नगर शहरात दुचाकी चोरीला जाण्याच्या घटना वाढत असताना आता चारचाकी वाहने चोरीला जावू लागले आहेत.
नगर शहरातील सावेडी उपनगरातील रासनेनगरच्या मयुरेश्वर अपार्टमेंट समोर लावलेली चारचाकी कार अज्ञात चोरट्याने लंपास केली.
सोमवारी रात्री 10 ते मंगळवारी सकाळी सहा वाजेच्या दरम्यान ही घटना घडली. या प्रकरणी चारचाकीचे मालक ज्ञानदेव एकनाथ हारदे (वय 60 रा. रासनेनगर, सावेडी) यांनी तोफखाना पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्याविरोधात चोरीचा गुन्हा दाखल केला आहे.
फिर्यादी यांनी त्यांची कार अपार्टमेंटमध्ये पार्क केली होती. दरम्यान वाढत्या चोरीच्या घटनांमुळे नागरिक त्रस्त झाले आहे. पोलिसांनी गस्त वाढवावी अशी मागणी नागरिक करू लागले आहे.