चोरट्यांचा धुमाकूळ ; मोबाईल शॉपी फोडून नऊ लाखांचा माल केला लंपास

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 14 फेब्रुवारी 2021:-जिल्ह्यातील गेल्या काही दिवसांपासून चोरी, लुटमारी आदी घटनांमध्ये वाढ झालेली पाहायला मिळते आहे.

कायदा व सुव्यवस्थेचा धाक चोरट्यांच्या मनात राहिला नसल्याने शहरासह जिल्ह्यात खुलेआम दिवसाढवळ्या चोऱ्यांचे प्रमाण वाढले आहे. नागरिकांच्या मनात दहशत माजविणाऱ्या चोरट्यांना गजाआड करण्यास पोलीस प्रशासनाला अपयश येत असल्याचे चित्र सध्या शहरात दिसून येत आहे.

नुकतेच श्रीरामपूर शहरातील मध्यवस्तीत बस स्टँडशेजारी नेवासा रोडवर असलेल्या एका मोबाईल शॉपी दुकानाचे शटरचे कुलूप तोडून शॉपीतील अडीच लाख रुपये रोख व अंदाजे 7 लाख रुपये किंमतीचा मोबाईल असा एकूण 9 लाखाचा ऐवज चोरट्यांनी चोरुन नेला. याप्रकरणी श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी कि, श्रीरामपूर शहरातील स्टँडशेजारीच वर्दळीच्या ठिकाणी श्रेया मोबाईल शॉपी या दुकानाचे शटरचे कुलूप तोडून चोरटयांनी गल्ल्यात असलेले अडीच लाख रुपये रोख तसेच वेगवेगळ्या कंपनीचे मोबाईल असा एकूण 9 लाख रुपये किंमतीचा ऐवज चोरुन नेल्याची शक्यता वर्तविली गेली.

भर बाजार पेठेत वर्दळीच्या ठिकाणचे मोबाईल शॉपीचे दुकान फोडल्यामुळे व्यापारी वर्गात खळबळ उडाली आहे. या घटनेची माहिती मिळताच सहा. पोलीस निरीक्षक समाधान सुरवाडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री. पाटील वपोलीस पथकाने घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी संपूर्ण दुकानाची पहाणी करत चौकशी केली.

अहमदनगर लाईव्ह 24