अहमदनगर Live24 टीम, 7 एप्रिल 2021 :- नगर तालुक्यातील निंबोडी शिवारात महिलेवर सामूहिक अत्याचार करणारा निलेश पोटे या तिसर्या आरोपीस पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
यापूर्वी दोघांना पोलिसांनी अटक केली आहे. याबाबत अधिक माहिती अशी कि, पीडित महिला कामानिमित्त नगर येथे आली होती.
काम आटोपल्यानंतर पीडित महिला रात्रीच्या वेळी आष्टीकडे जात असताना निंबोडी शिवारात तिच्यावर सामूहिक अत्याचार करण्यात आला.
याबाबत भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात 25 वर्षीय पीडित महिलेच्या फिर्यादीवरून तीन आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
पोलिसांनी तातडीने तपासाची सुत्रे फिरवून आरोपी अक्षय कचरू माळी आणि आकाश पोटे यांना जेरबंद केले होते. तर तिसरा आरोपी निलेश पोटे हा घटनेनंतर पसार झाला होता.
सोमवारी सकाळी आरोपी निलेश पोटे हा त्याच्या निंबोडी येथील राहत्या घरी आला असल्याची माहिती कॅम्प पोलिसांना समजली.
त्यानंतर पोलिसांच्या पथकाने आरोपी निलेश पोटे याला अटक केली आहे. त्याला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने पाच दिवसांची पोलीस कोठडी दिली आहे.