राज्याच्या राजकारणात ट्विस्ट ! शरद पवार पोहोचले दिल्लीत…

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 20 जून 2021 :- महाराष्ट्रातील राजकरणाच्या पडद्याआड अनेक घडामोडी होत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आज दिल्लीत दाखल झाले आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या भेटीनंतर आता शरद पवार दिल्लीत दाखल झाले आहेत. शरद पवार यांच्या दिल्लीतील दौऱ्यामुळे राजकीय वर्तुळात आता जोरदार चर्चा सुरु झाली आहे. विविध तर्कवितर्क सुद्धा लावले जात आहेत.

तर असे सुद्धा बोलले जात आहे की, केरळ मधील प्रमुख नेते शरद पवार यांना भेटणार आहेत. त्यामुळे आता नेमक्या कोणत्या नेत्यांची शरद पवार भेट घेणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. आता शरद पवार यांचा दिल्ली दौरा हा नेमका कोणत्या कारणासाठी आहे याबद्दल चर्चांना उधाण आले आहे.

यापूर्वी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली होती. त्यावेळी उद्धव ठाकरे यांच्यासोबत त्यांच्या शिष्टमंडळातील काही नेतेमंडळी सुद्धा उपस्थितीत होती. मात्र बैठकीनंतर उद्धव ठाकरे आणि नरेंद्र मोदी यांच्यात खासगी बैठक सुद्धा झाली.

राज्यातील महाविकास आघाडी मध्ये कोणतेच मतभेद नसल्याचे वारंवार स्पष्टीकरण दिले जात होते. मात्र आजच शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना एक पत्र लिहिले आहे.

त्यामध्ये त्यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेना पक्षाला कमकुवत करत असल्याचा दावा केला आहे. यामुळे नक्की महाविकास आघाडीमध्ये मतभेद असू शकतात अशी चर्चा जोर धरु लागली आहे. दुसऱ्या बाजूला आजच शरद पवार यांचा दिल्ली दौरा हा सुद्धा चर्चेचा विषय ठरला आहे.

त्यामुळे राजकरणात नेमक काय खलबतं सुरु असू शकते याचा अंदाज राजकीय विश्लेषकांकडून लावला जात आहे. पण या दौऱ्यादरम्यान पवार आणखी कुणाची भेट घेणार का? याबाबत उत्सुकता आहे.

महाराष्ट्राच्या राजकारणात पडद्यामागे अनेक घडामोडी घडत आहेत. त्याच पार्श्वभूमीवर ही घडामोडी आहे का? असा प्रश्न उपस्थित होतोय.

अहमदनगर लाईव्ह 24