अहमदनगर Live24 टीम, 1 मे 2021 :-दुसऱ्या लाटेत भालगाव सारख्या मोठ्या लोकसंख्येच्या गावात राहणाऱ्या एकाही नागरीकाला कोरानाची बाधा झाली नाही असा दावा ग्रामस्थांनी केला आहे.
कोरोना नियमांचे काटोकोरपणे पालन, सार्वजनिक स्वच्छता, लसीकरणावर जोर व महत्वाच्या कामाशिवाय घराबाहेर न पडणे हे सुत्र ग्रामस्थांनी पाळले आहे.
आशा स्वंयसेविका, वैद्यकीय अधिकारी,आरोग्य सेविका, अंगणवाडी सेविका व मदतनीस यांनी सर्वांनी मिळुन केलेल्या कामाचे हे फळ असल्याचे गावाचे मार्गदर्शक व भारतीय जनतापक्षाचे तालुकाध्यक्ष माणिक खेडकर यांनी सांगितले.
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत भालगाव गावात कोरोनाता रुग्ण सापडला नाही. बाहेरगावी राहणारे लोकांना झाला असेल.
मात्र गावात कायम राहणाऱ्यापैकी कुणीही बाधीत नाही. गावच्या सरपंच डॉ.मनोरमा खेडकर, उपसरपंच सुमन खेडकर आणि सर्वच ग्रामस्थ यांनी यासाठी चांगले काम केले आहे. गावात स्वच्छता मोहीम राबविली.
आशा स्वंयसेविका, वैद्यकीय अधिकारी, आरोग्य सेविका, अंगणवाडी सेविका व मदतनीस यांनी सर्वांनी मिळुन सर्वेक्षण व कोरोनाची काळजी घेण्यासाठी चांगले काम केले. नागरीकांनीही त्यांना चांगले सहकार्य केले.
गावाचे मार्गदर्शक माणिक खेडकर यांनीही गावाकऱ्यांना आवाहन केले. नागरीकांनी कोरोना नियमांचे पालन केले. गावात कोरानाचा शिरकाव झआला नाही.
पंचायत समितीचे विस्तार अधिकारी प्रशांत तोरवणे व प्रांतअधिकारी देवदत्त केकाण यांनी भालगावला भेट दिली. गावात कोरोना नियम पाळले याबद्दल ग्रामस्थांचे कौतुक केले आहे.