अहमदनगर Live24 टीम, 24 जून 2021 :- श्रीगोंदा तालुक्यातील विसापूर फाटा या परिसरात दि. २० ऑगस्ट २०२० रोजी स्वस्तात सोन्याच्या खरेदी विक्रीतून आदिवासी समाजातील चार इसमांचा खून झाल्याची घटना घडली होती.

याप्रकरणी बेलवंडी पोलिस ठाण्यात अक्षदा कुंजा चव्हाण या महिलेने नरेश सोनवणे, प्रेमराज पाटील ,कल्पना सपकाळ,आणि आशाबाई सोनवणे यांच्या विरोधामध्ये गुन्हा दाखल केला होता.

यातील महिला आरोपी आशाबाई सोनवणे हिला न्यायालयाने जामीन मंजुर केल्याने उर्वरित तीन जणांचा जमिनाचा मार्ग मोकळा झाला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी कि, श्रीगोंदा तालुक्यातील सुरेगाव येथील पाच ते सहा जणांनी स्वस्तात सोन्याचे आमिष दाखवून जळगाव येथील चौघांवर विसापूर फाट्याजवळ हल्ला करण्याचा प्रयत्न केला.

त्यावर स्वत:च बचाव करण्यासाठी जळगाव येथील आरोपींनी आदिवासी आरोपीवर प्रतिहल्ला केला. त्यात नाथिक्या चव्हाण, श्रीधर कुंजा चव्हाण, नागेश कुंजा चव्हाण, लिंब्या हाबऱ्या काळे हे ठार झाले होते.

हे प्रकरण राज्यभर गाजले होते. याप्रकरणी नरेश सोनवणे, प्रेमराज पाटील, कल्पना सपकाळ, आशाबाई सोनवणे यांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला होता.

दरम्यान जामिनाबाबत मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात सुनावणी झाली. न्यायालयाने आशाबाई सोनवणे या महिला आरोपीस जामीन मंजूर केला.

अहमदनगर लाईव्ह 24