क्रिकेट खेळणाऱ्या तरुणाला कोर्टाने थेट तुरुंगात धाडलं

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 25 एप्रिल 2021 :-सध्या आयपीएलचा थरार सुरु आहे. सध्या लॉकडायन असल्याने नागरिक घरात बसूनच क्रिकेट पाहण्याचा आनंद लुटत आहे.

मात्र मुंबईमध्ये एका तरुणाला क्रिकेट खेळणे चांगलेच महागात पडले आहे. घराबाहेर क्रिकेट खेळणाऱ्या या तरुणाला न्यायालयाने थेट तुरुंगात धाडले आहे.

कोरोनाची रुग्णसंखया वाढलीय म्हणून महाराष्ट्र सरकारने सर्वत्र संचारबंदी लागू केली आहे. मात्र या संचारबंदीत रस्त्याच्या मधोमध काही तरुणांनी क्रिकेटचा डाव मांडला होता.

या तरुणांनी संचारबंदीचे उल्लंघन करण्याबरोबरच तोंडावर मास्कही लावला नव्हता. याप्रकरणी मुंबई पोलिसांनी सहा जणांवर गुन्हा दाखल केला.

यातील 20 वर्षीय मोहम्मद कुरेशी याला पोलीसांनी अटक केली होती. बाकीचे साथीदार घटनास्थळावरून पळून जाण्यात यशस्वी झाले.

मात्र मोहम्मद कुरेशीला पोलिसांनी पकडून न्यायालयात हजर केले. कुरेशी याने जामिनासाठी केलेला अर्ज मुुंबईच्या सत्र न्यायालयाने फेटाळून लावला आहे.

आरोपी तरुणांनी कोरोना संसर्ग रोखण्यासंदर्भातील राज्य सरकारची मार्गदर्शक तत्वे तसेच संचारबंदीचे पालन केलेले नाही,

असे निरीक्षण अतिरिक्त सत्र न्यायाधीश अभिजित नांदगावकर यांनी हा निकाल देताना नोंदवले.

  • ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|
अहमदनगर लाईव्ह 24