तरुणाचे अपहरण करून केले कोयत्याने वार !

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 22 जून 2021 :- विद्देचे माहेरघर असलेल्या पुण्यात दिवसेदिवस कायदा व सुव्यवस्था बिघडत चालली आहे. नुकतीच भरदिवसा एक तरुणाचे अपहरण करून त्याच्यावर कोयत्याने वार केल्याची घटना घडली आहे.

अनिकेत घायतडक याचा काही दिवसांपूर्वी खून झाला होता. मात्र आपल्या भावाच्या खून प्रकरणात तरुणाच्या मित्राचा हात असल्याच्या

संशयातून सागर घायतडक याने त्याच्या साथीदारांच्या मदतीने तरुणाचे अपहरण करून त्याच्यावर कोयत्याने वार केल्याची धक्कादायक घटना फुरसुंगी येथे घडली.

या प्रकरणी सागर घायतडक, किरण शिंदे, नयन कोळेकर या दोघांसह १० ते १५ जणांविरुद्ध हडपसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत सविस्तर असे कि, आरोपी सागर घायतडक याचा भाऊ अनिकेत घायतडक याचा काही दिवसांपूर्वी खून झाला आहे. संबंधित खूनप्रकरणी फिर्यादी ओंकार लोंढे याचा मित्र बंटी तुपे आणि शुभम मोडक यांचा हात असल्याचा संशय सागरला होता.

त्याचा राग मनामध्ये धरून आरोपींनी ओंकारचे अपहरण केले. त्याला फुरसुंगी परिसरात नेऊन त्याच्यावर कोयत्याने वार केले. या प्रकरणी ओंकार तुकाराम लोंढे यांनी तक्रार दिली असून हडपसर पोलिस अधिक तपास करीत आहेत.

अहमदनगर लाईव्ह 24