Aadhaar Card : आधारबाबत मोठी बातमी ! आता करावा लागेल ‘हे’ काम नाहीतर होणार ..

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Aadhaar Card : देशातील जवळपास प्रत्येक व्यक्तीकडे आज आधार कार्ड उपलब्ध आहे. या कार्डचा वापर करून आज सरकारच्या विविध योजनांचा आपण लाभ घेऊ शकतो तसेच संपूर्ण देशात या कार्डमुळे राहू शकतो आणि आपल्या बँकेचे देखील काम आपण आधार कार्डच्या मदतीने करू शकतात.

यामुळेच आज आधार कार्ड देशातील सर्वात महत्वाचे दस्तऐवज बनले आहे. मात्र आता आधार कार्डबाबत एक मोठी माहिती समोर आली आहे. युनिक आयडेंटिफिकेशन ऑथॉरिटी ऑफ इंडिया (UIDAI) ने म्हटले आहे की ज्या रहिवाशांना 10 वर्षांपूर्वी युनिक आयडेंटिफिकेशन नंबर मिळाला आहे आणि या कालावधीत कधीही त्यांची कागदपत्रे बदलली नाहीत त्यांनी त्यांची नवीन माहिती अपडेट करावी.

UIDAI cancels 6 lakh Aadhaar cards in 'that' case

UIDAI ने एका निवेदनात म्हटले आहे की, आधार धारक माय आधार पोर्टलद्वारे सहाय्यक कागदपत्रे (ओळख आणि पत्त्याचा पुरावा) ऑनलाइन अपडेट करू शकतात. याशिवाय, त्यांना हवे असल्यास, ते आधार केंद्रावर जाऊन त्यांची विशिष्ट ओळख माहिती ऑफलाइन देखील बदलू शकतात.

ज्या रहिवाशांनी 10 वर्षांपूर्वी त्यांचे आधार तयार केले होते आणि या वर्षांत ते कधीही अपडेट केलेले नाहीत, अशा आधार धारकांनी त्यांची कागदपत्रे अपडेट करावीत, असे निवेदनात म्हटले आहे. गेल्या दशकभरात, आधार क्रमांक हा भारतातील रहिवाशांसाठी ओळखीचा स्वीकारलेला पुरावा म्हणून उदयास आला आहे. केंद्र सरकारच्या 319 योजनांसह 1100 हून अधिक सरकारी योजना आणि कार्यक्रमांमध्ये आधार ओळख म्हणून स्वीकारला जातो.

हे पण वाचा :- Best Scooters 2022: ‘ह्या’ आहे देशात सर्वाधिक विकल्या जाणाऱ्या टॉप 10 स्कूटर! खरेदीपूर्वी पहा संपूर्ण लिस्ट