Ahmednagarlive24 Marathi News
Marathi Breaking News, Marathi Live Batmya, मराठी बातम्या

Aadhaar Card : जर बदलायचा असेल आधारमधील फोटो तर करा ‘या’ सोप्या स्टेप्स फॉलो, मोजावे लागतील इतके पैसे

Aadhaar Card : जर भारतातील तुमची ओळख सांगायची असेल तर तुमच्याकडे आधार कार्ड असावे लागते हे तुम्हाला माहीतच असेल. कोणतेही सरकारी किंवा तुमचे खाजगी काम असेल तर त्या ठिकाणी तुम्हाला आधार कार्ड लागते.

ब्रेकिंग बातम्या मोफत वाचण्यासाठी इथे क्लिक करा

इतकेच नाही तुम्हाला आधार कार्डचा वापर करून सरकारी लाभ घेता येतो. जर तुमच्याकडे आधार नसेल तर तुमची अनेक कामे रखडली जातात. परंतु अनेकांचे आधार कार्डमधील फोटो खराब येतात. परंतु काळजी करू नका तुम्ही आता खूप सोप्या पद्धतीने आधार कार्डमधील फोटो बदलू शकता.

तुम्ही आता सहज तुमच्या आधार कार्डमधील युनिक आयडेंटिफिकेशन अथॉरिटी ऑफ इंडियाच्या वेबसाइटला भेट देऊन नाव, मोबाइल नंबर, पत्ता, लिंग, जन्मतारीख आणि फोटो बदलू शकता. यासाठी तुम्हाला कुठेही जाण्याची गरज नाही तुम्ही हे काम घरी बसून करू शकता, परंतु यासाठी तुमच्याकडे फिंगर स्कॅनर असावा.

असे करा अपडेट

  • तुम्हाला सर्वात अगोदर UIDAI वेबसाइटवर जावे लागणार आहे.
  • त्यानंतर आता तुम्हाला आधार विभागात जाऊन आधार नोंदणी फॉर्म अपडेट फॉर्म डाउनलोड करावा लागणार आहे.
  • आता तुम्हाला फॉर्म भरून तो कायमस्वरूपी नावनोंदणी केंद्रात सबमिट करावा लागणार आहे.
  • तसेच या ठिकाणी तुमचे बायोमेट्रिक तपशील घेण्यात आले आहेत.
  • आता ही प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर, तुम्हाला एक पोचपावती देण्यात येईल ज्यात एक URL असेल.
  • तुम्ही हे URN वापरून अपडेट तपासू शकता.
  • यानंतर तुमच्या आधारची इमेज सहज अपडेट होते.

जाणून घ्या शुल्क आणि वेळ

तुमच्या आधार कार्डमध्ये फोटो अपडेट होण्यासाठी एकूण 2 आठवड्यांचा कालावधी लागू शकतो. तुमचे नवीन आधार कार्ड अपडेट करण्यात येते आणि तुमच्या नोंदणीकृत पत्त्यावर पाठवण्यात येते. तसेच तुम्हाला फोटो बदलण्यासाठी ठराविक फी भरावी लागणार आहे.