आला… रे… आला फळांचा राजा आला ! भाव कोसेळल्याने मनसोक्त आंबे खा !!

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 03 मार्च 2021:-यंदा चांगले पर्जन्यमान असल्याने सर्वच फळांचे मोठ्या प्रमाणात उत्पादन झाले आहे. यात प्रामुख्याने आपण सर्वजन ज्याची आतुरतेने वाट पाहत असतो तो सर्व फळांचा राजा समजला जाणारा आंबा नगरच्या बाजारात दाखल झाला आहे.

चांगले उत्पादन झाले असल्याने मोठ्या प्रमाणात आंब्याची आवक होत असल्याने दर खूप कोसळल्याने यावेळी आंबा सर्वसामान्याच्या आवाक्यात असून खव्वयांसाठी ही आनंदाची बातमी आहे. ग्राहकांचा खास आवडता हापूस, रत्नागिरी, पायरी, म्हैसूर, लालबाग हे वाण नगरच्या बाजारपेठेत दाखल झाले आहेत.

आवक वाढल्याने आंब्याचे भाव प्रतिडझन ३०० रुपयांनी घसरले आहेत. आंब्याचे भाव कोसळल्याने मात्र ग्राहकांची चंगळ झाली आहे. सध्या आंब्याची मागणी बऱ्यापैकी असून, पुढील आठवड्यात आंब्याचे भाव आणखी कमी होण्याची शक्यता आहे. यंदा मद्रासमधून लालबागचा आंबा नगरला आला आहे.

सुरुवातीला लालबाग प्रति किलो १०० रुपये होता. मात्र आता तो ६० ते ७० रुपये प्रतिकिलो विकला जात आहे. केरळच्या हापूस पायरीचा दोन डझनच्या पेटीचा दर १००० ते १२०० रुपये आहे. नगरसह राज्यात प्रसिद्ध असलेला रत्नागिरीचा हापूस आंब्याच्या दोन डझन पेटीचा १६०० ते १८०० रुपये आहे.

त्याचबरोबर देवगड हापूसला २००० ते २२०० रुपये इतका आहे. बदाम आंबा ११० रुपये किलोने विकला जात आहे. म्हैसूरच्या दोन डझन पेटीचा भाव १४०० ते १६०० रुपये इतका आहे.

बाहेरील राज्यातून प्रसिद्ध आंबे नगरमध्ये दाखल झाले असून, ग्राहकांची बऱ्यापैकी मागणी आहे. मागील वर्षीच्या तुलनेने यंदा आंब्याचा भाव पेटीमागे ३०० ते ४०० रुपये कोसळला आहे. पुढील आठवड्यात मोठ्या प्रमाणावर आवक वाढणार असल्याने आंब्याचे भाव आणखी कमी होणार असल्याचेही व्यापाऱ्यांनी सांगितले.

  • ब्रेकिंग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|
अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24