Sushama Andhare : “आपला नीतू आणि नीलू प्रचंड आगावू आहेत, नारायण राणेंनी चांगले संस्कार दिले नाहीत”

Sushama Andhare : शिवसेना ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे या सतत भाजप आणि शिंदे गटावर सडकून करत असतात. शिंदे गटातील आमदारांनी बंडखोरी केल्यानंतर सुषमा अंधारे यांनी त्यांना पळो की सळो करून सोडले आहे. आजही सुषमा अंधारे यांनी भाजपच्या नेत्यांवर टीकास्त्र डागले आहे.

ब्रेकिंग बातम्या मोफत वाचण्यासाठी इथे क्लिक करा

भाजप आमदार नितेश राणे यांनी सुषमा अंधारेंना डिवचण्याचा प्रयत्न केला मात्र सुषमा अंधारे यांनी नितेश राणेंना सडेतोड उत्तर दिले आहे. सुषमा अंधारे यांनी नाशिकमधील पत्रकार परिषदेत राणे कुटुंबावर हल्ला चढवला.

नितेश राणे यांनी सुश्स्म अंधारे यांचा एक जुना व्हिडीओ व्हायरल केला आहे. त्यामध्ये राणे बाळासाहेब ठाकरे यांच्यावर टीका करताना दिसत आहेत. तसेच त्यांनी एक प्रश्न देखील केला आहे. बाळासाहेबांवर थिल्लरपणे टीका करणाऱ्यांच्या हातात शिवबंधन? सांगा कुणी केली गद्दारी?

Advertisement

याच टीकेला सुषमा अंधारे उत्तर देताना म्हणाल्या, आपला नीतू आणि नीलू प्रचंड आगावू आहेत. नारायण राणे यांनी त्यांना चांगले संस्कार दिले नाहीत. तो व्हिडीओ जुना आहे.

विचारांचे खंडनमंडन करावे लागते. राणेंच्या मुलांचा अभ्यास कमी आहे. मी त्यांचा कणकवलीत जाऊन होमवर्क घेतल्याने ते अस्वस्थ झाले आहेत, अशी सडकून टीका सुषमा अंधारे यांनी केली आहे.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनाही टोला

Advertisement

सुषमा अंधारे यांनी यावेळी भाजप नेते आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावरही टीका करण्याची संधी सोडली नाही. देवेंद्र फडणवीसांविषयी बोलताना म्हणाल्या, गृहमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस कुचकामी आहेत.

ते गृहमंत्र्यासारखे वागत नाहीत. एकाच पक्षाचे असल्या सारखे वागतात. एकीकडे महिलांना फक्त धक्का लागल्याने गुन्हा दाखल होतो. मात्र काही लोक महिलांचा अपमान करूनही गुन्हा दाखल होत नाही असा टोमानही त्यांनी फडणवीसांना लगावला आहे.

सगळी खाते फडणवीस यांच्याकडे आहेत. याचा अर्थ भाजपच्या इतर लोकांना अक्कल नाही का? असा सवाल करतानाच देवेंद्र फडणवीस सत्ता पिपासू आहेत का? असा प्रश्नही त्यांनी यावेळी केला. तसेच राज्यपाल भगतसिंह कोश्यारी हे भाजपचे पूर्णवेळ कार्यकर्ते असल्याचा आरोपही अंधारेंनी केला आहे.

Advertisement