अबब… जिल्ह्यात ७५ लाखाची दारू पकडली,

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 28 एप्रिल 2021 :-येथील दारुबंदी उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाने बाभळेश्वर परिसरात साफळा रचून महाराष्ट्रात विक्रीस प्रतिबंध असलेली गोवा राज्यातील दारुचे 1200 बॉक्स आणि आयशर ट्रक असा 94 लाख 88 हजार रुपयांचा माल जप्त केला आहे.

या प्रकरणी गहु देविसिग मिल याला अटक करण्यात आली आहे. नगर येथील दारुबंदी विभागास अवैध दारूची वाहतूक होणार असल्याची माहिती मिळाल्यावर श्रीरामपूरच्या भरारी पथक क्र. दोन या विशेष पथकाने बाभळेश्वर, अस्तगाव परिसरात सापळा लावला होता.

नगर-मनमाड रोडवरील अस्तगाव फाटा येथे गोवा राज्य निर्मित व महाराष्ट्र राज्यात विक्रीस प्रतिबंध असलेली अवैध मद्याची वाहतूक करणारा आयशर ट्रक (एम.एच. 18 बी.जी. 5274)ची तपासणी केली असता

74 लाख 88 हजार रुपये किंमतीच्या रॉयल ब्लु व्हिस्कीच्या 180 मि.ली.च्या57 हजार 600 बाटल्या आढळून आल्या. पोलिसांनी दारूच्या बाटल्यांसह 20 लाख रुपये किंमतीचा आयशर कंपनीचा ट्रक जप्त केला

  • ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|
अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24