अबब…पोलिसाच्या शेतातच सापडला गांजा

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 4 एप्रिल 2021 :-पिंपळगाव-फुणगी परीसरात शेतात गांजा आढळल्याप्रकणी राहुरी पोलिसांनी छापा टाकत दिड लाख रूपये किंमीच्या गांज्यासह शेतकरी व शेतमजुरावर गुन्हा दाखल केला आहे.

विशेष म्हणजे सदर शेतक-यांचा मुलगा व मुलगी हे दोन्हीही पोलिस खात्यात असल्याचे समजते त्यामुळे पोलिसांच्याच शेतात गांजा असल्याने याबाबत जोरदार चर्चा परीसरात होती. पिंपळगाव- फुणगी (ता.राहुरी)

येथील शेतकरी बाळासाहेब दगडु थोरात यांच्या गट नं.२२४\१ शेतात मोसंबीच्या बागेत व ऊसाच्या शेतात ठिकठिकाणी गांजाची झाडे असल्याची गुप्त खबर राहुरी पोलिसांना मिळतातच राहुरीचे नुतन पोलिस निरीक्षक नंदकुमार दुधाळ

यांनी पोलिस फौज फाट्यासह नायब तहसीलदार आण्णासाहेब डमाळे व महसुल पथकासह घटनास्थळी छापा टाकला असता थोरात यांच्या शेतात ओली गांज्याची झाडे आढळुन आली.

पोलिसांनी १५ किलो ४०० ग्रॅम वजनाचा अंदाजे १ लाख ५४ हजार ७० रूपये किमतीचा ओला गांजा हस्तगत केला असुन पोलिस उपनिरीक्षक निरज बेकील

यांच्या फिर्यादिवरून आरोपी शेतमजुर बाजीराव रभाजी खेमनर (वय ७०) व शेतकरी बाळासाहेब दगडु थोरात राहणार पिंपळगाव फुणगी यांच्या विरोधात गुन्हा रजिस्टर नंबर व कलम २८१ /२०२१ एन.डी.पी.एस.अॅक्ट कलम २० प्रमाने गुन्हा दाखल केला आहे.

आरोपी शेतमजुर बाजीराव खेमनर यास अटक करण्यात आली आहे.पुढील तपास पोलिस निरीक्षक नंदकुमार दुधाळ हे करत आहे.

पोलिस निरीक्षक दुधाळ यांच्या सह पोलिस उपनिरीक्षक मधुकर शिंदे,निरज बेकील आदिंच्या पथकाने हि कारवाई केली आहे.सदर शेतक-यांस व शेतमजुरास गांजाचे ओढण्याचं व्यसन असल्याने त्यांनी शेतात हि झाडे लावली असल्याची चर्चा परीसरात सुरू होती.

  • ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|
अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24