अबब… १,७२,७३,५५,२०० इतका खर्च करतात फेसबुकचे सीईओ मार्क झुकरबर्ग स्वत:च्या सुरक्षेवर!

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 13 एप्रिल 2021 :-  फेसबुकचे सीईओ मार्क झुकरबर्ग हे आपल्या सुरक्षेवर खूपच जास्त पैसे खर्च करीत आहेत. यावर खर्च होणारी रक्कम ऐकल्यानंतर तुम्हाला धक्काच बसेल.

झुकरबर्ग यांनी २०२० मध्ये आपल्या सुरक्षेवर एकूण २३ मिलियन डॉलर्स म्हणजेच १७२ कोटी रुपये खर्च केले होते, याचा खुलासा युनायटेड स्टेट्स सिक्योरिटी अँड एक्सचेंज कमिशनने केला आहे.

कमिशनने यासंबंधी माहिती देताना सांगितले की, झुकरबर्ग यांच्या जीवाला धोका आहे. त्यांच्या कुटुंबासाठी सुरक्षा वाढवण्यासाठी रक्कम आणखी वाढली आहे.

तसेच यात कोरोनाचे नियम पासून अमेरिका निवडणूक २०२० आणि दुसरी रिस्कचा समावेश आहे. त्यामुळे त्यांना स्वतःला आणि त्यांच्या कुटुंबासाठी सुरक्षा ठेवावी लागते.

सिक्योरिटी पर्सनल खर्चापासून रोजच्या खर्चासाठी झुकरबर्ग एक्स्ट्रा १० मिलियन डॉलर्स खर्च करीत आहेत. वर्ष २०२० मध्ये बेस सिक्योरिटीचा खर्च १३.४ मिलियन डॉलर्स होता. तो २०१९ मध्ये १०.४ मिलियन डॉलर्स होता.

सोशल मीडियावरील फेसबुकचा कोट्यवधी लोक वापर करीत आहेत. भारतात सुद्धा फेसबुक वापरणाऱ्यांची संख्या काही कमी नाही.

परंतु, गेल्या काही दिवसांपासून फेसबुक आणि व्हॉट्सअॅपसाठी दिवस थोडे अडचणीचे ठरू लागले आहेत. अनेकदा कंपनीचे सीईओ मार्क झुकरबर्ग यांना कोर्टात हजेरी लावावी लागली आहे.

  • ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|
अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24