अहमदनगर Live24 टी म, 24 सप्टेंबर 2021 :-  राहाता तालुक्यातील कोल्हार येथे किरकोळ कारणावरून झालेल्या वादातून हातात तलवारी घेऊन एका गटाने धुडगुड घातला असून याबाबतचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

याबाबत सूत्रांकडून समजलेली माहिती अशी की, बुधवारी रात्री एका मोटासायकलचा धक्का लागण्याच्या कारणावरून दोन गटात वाद झाले होते.त्याचे रूपांतर आज तीव्र झाले होते.

रका गटातील मंडळीनी हातात नंग्या तलवारी घेऊन हल्ला घेऊन दहशत करत महिलांसोबत गैरवर्तन करून जातीवाचक शिवीगाळ केली आहे. या प्रकरणाची तक्रार देण्यासाठी महिला लोणी पोलीस ठाण्यात पोहचल्या होत्या.

उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रकिया सुरू होती.दरम्यान सोशल मीडियावर हातात नंग्या तलवारी घेऊन सुरू असलेल्या वादावादीचा व्हिडीओ आज सोशल मीडियावर जिल्ह्यात सर्वत्र व्हायरल झालेला पहावयास मिळाला.