अबब! ट्रकचालकाने १६लाखांची साखर परस्पर विकली अन…..

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 20 जुलै 2021 :- संगमनेर येथील थोरात सहकारी साखर कारखान्यातून फलटण येथील व्यापाऱ्याने खरेदी केलेली १६ लाख ६६ हजार ६४१ रुपयांची साखर संबंधित व्यापाऱ्यापर्यंत न पोहोचवता ती दुसऱ्याच व्यापाऱ्याला विकली.

धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. दरम्यान याबाबत विचारना करणाऱ्या व्यापाऱ्यास शिविगाळ करून दमदाटी केल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी तीन जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या बाबत अधिक माहिती अशी, सातारा जिल्ह्यातील फलटण येथील मंजुश्री महेश करवा यांनी थोरात साखर कारखान्यातून ५०० पोते साखर खरेदी केली होती. करवा यांनीही साखर प्रकाशचंद ओसवाल या व्यापाऱ्याला देण्यास संबंधितांना सांगितले होते.

परंतु ट्रकचालकांनी व अन्य एकाने ही साखर ओसवाल यांना देण्याऐवजी ती इतर व्यापाऱ्यांना विकली. साखरेबाबत करवा यांनी ओसवाल यांच्याकडे चौकशी केली असता आपल्याला अद्याप साखर मिळाली नसल्याचे त्यांनी सांगितले.

यानंतर त्यांनी संबंधित ट्रकचालकांना विचारले असता त्यांनी करवा यांना फोनवरून शिवीगाळ व दमदाटी केली. साखरेचा अपहार करून ती परस्पर विकल्याचे करवा यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी संगमनेर येथे येऊन याबाबत शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.

अहमदनगर लाईव्ह 24