अहमदनगर Live24 टीम, 6 ऑगस्ट 2021 :- व्याज किती घ्यावे याला मर्यादा आहेत मात्र अनेकजण संकटात सापडलेल्या सर्वसामान्याला पुरता ओरबडून खातात. महिन्याला चक्क ४५ टक्क्याने व्याज दहा हजाराला रोज १५०रूपये व्याज घेणारा सावकार साठ हजाराचे रोज ९०० रूपये असे १ लाख ५१ हजार दिले तरी मुद्दल शिल्लकच ठेवले होत.
काही आठवडे व्याज थकले म्हणून दुचाकी गाडी ही ओढून नेली होती अशा सावकारावर कर्जत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. कर्जत पोलिसांनी सावकारकीच्या विरोधात सुरू केलेल्या मोहिमेमुळे तालुक्यातील नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. कोट्यवधी रुपयांच्या फासातून नागरिकांचीसुटका तर झालीच आहे.
यादव यांच्या धास्तीने सावकार परस्परच तडजोडी करून आपल्या व्याजाची रक्कम माफ करत आहेत. असे असले तरी सावकारांच्या व्याजाच्या अवैध व्यवसायातील अनेक करामती पाहून पोलीस यंत्रणाही चक्रावून जात आहे.
कर्जत येथील खाजगी सावकार अभि उर्फ बुट्या अनिल पवार याच्याकडून तक्रारदाराने आपल्या मुलीच्या उपचारासाठी आठ महिन्यांपूर्वी ६० हजार रुपये (१० हजाराला १५० रुपये रोज) याप्रमाणे पैसे घेतले होते. प्रत्येक आठवड्याला व्याजापोटी ६ हजार ३०० रक्कमही रोख स्वरूपात सावकाराला देत होते.
फिर्यादीने सुमारे ६ महिने व्याजापोटी १ लाख ५१ हजार रुपये दिले. मात्र परिस्थितीमुळे व पैसे न जुळल्याने दोन महिन्याचे व्याज देता आले नाही. आरोपीने प्रत्यक्ष व फोनवर व्याजाच्या पैशांसाठी तगादा लावला.
फिर्यादीने विनंती केली मात्र ‘रोजाच्या पैशाला मी थांबू शकत नसल्याचे सांगत मला आत्ताच्या आत्ता पैसे हवेत नाहीतर मी तुला बघून घेईन’ असा दम देत होता. त्यानंतर दि.२ रोजी आरोपीने घरी येऊन पैशांची मागणी केली.
मात्र ‘आत्ता पैसे नाहीत पैसे आल्यानंतर व्याजासह देईन’ असे त्याला सांगितले मात्र ‘तुझे आ त्ता नेहमीचेच झाले’ असे म्हणत फिर्यादी वापरत असलेला हिरो होंडा कंपनीची मोटारसायकल (एम.एच.१६ व्ही.३२२७) ही जबरदस्तीने घेऊन गेला. मोटारसायकल माझी नाही, मित्राची वापरत आहे.
ती नेऊ नकोस’ असा फिर्यादीने विरोध केला मात्र ‘माझे व्याजासहित पैसे परत दिले तरच तुला मोटारसायकल देईन’ असा दम देऊन बळजबरीने मोटार सायकल घेऊन गेला. कर्जत पोलिसांनी या सावकारावर गुन्हा दाखल केला आहे.