अहमदनगर Live24 टीम, 27 डिसेंबर 2020 :- आई वडील झाल्यानंतर आपल्या बाळाला नाव देण सर्वात मोठ काम असत. काही लोक त्यांच्या बाळाला प्रसिद्ध नाव देतात.तर काही अस वेगळ नाव देण्याचा प्रयत्न करतात.
ऑस्ट्रेलियातील एका कपलने त्यांच्या बाळाला अस नाव ठेवल आहे कि त्या बाळाला २०८० पर्यंत फ्रीमध्ये पिझ्झा खायला मिळणार आहे. जगभरात Domino’s च्या वतीने एक स्पर्धा घेण्यात आली.
ज्यात हे कुटुंब विजयी ठरले. त्यांना सर्वाना ६० वर्षापर्यंत मोफत पिझ्झा खायला मिळणार आहे. मीडियाकडून यासंदर्भात स्पष्टीकरण देण्यात आले आहे.डॉमिनाझ कंपनीला ६० वर्ष पूर्ण झाले.
त्यानिमित्ताने त्यांनी एक स्पर्धा आयोजित केली होती.त्यांनी हि घोषणा इंस्टाग्रामवरच्या पोस्टमधून केली आहे. या स्पर्धेची घोषणा करताना त्यांनी एक अट ठेवली होती.
ऑस्ट्रेलियामध्ये जर कुणाचं बाळ ९ डिसेंबर २०२० ला जन्माला येत असेल आणि त्याचे पालक त्याच नाव Dominac किंवा Dominique ठेवत असतील तर त्यांना पुढील ६० दशक म्हणजे ६० वर्ष फ्रीमध्ये डॉमिनोज पिझ्झा खायला मिळेल.
हि स्पर्धा ऑस्ट्रेलियातील कपलनी जिंकली आहे.क्लेमेंटाईन आणि ऍंथनी लूत यांनी हे चॅलेंज जिंकलं आहे. या कपलला त्यांच्या घऱच्यांनी सांगितल्यावर या स्पर्धेबाबत कळले. त्यांना या स्पर्धेबाबत अजिबात कल्पना नव्हती.
त्यांनी आधीच त्यांच्या मुलाचं Dominic नाव ठेवले होते.९ डिसेंबरला संपूर्ण ऑस्ट्रेलियात या एकुलत्या एक कपलने आपल्या मुलाचे नाव ठेवले होते.आता या पैजेनुसार या कपलला ६० वर्षापर्यंत दर महिन्याला १४ डॉलरचा पिझ्झा फ्री मिळणार आहे.