अहमदनगर Live24 टीम, 21 मे 2021 :- राहुरी खुर्द येथील एका अल्पवयीन मुलीचे अपहरण करून नेल्याची घटना बुधवारी पहाटेच्या दरम्यान घडल्याने खळबळ उडाली.
या घटनेबाबत राहुरी पोलिस ठाण्यात अज्ञात व्यक्ती विरोधात अपहरणचा गुन्हा दाखल करण्यात आला. राहुरी खुर्द येथे आई-वडिलांसोबत ही मुलगी राहत होती.
बुधवारी, १९ मे रोजी पहाटे चार ते सहा वेळेत अज्ञात व्यक्तीने तिच्या घरातून पळवून नेले. घरातील इतर लोक सकाळी उठल्यानंतर या प्रकार त्यांच्या लक्षात आला.
घरातील मंडळीने मुलीचा शोध घेतला. मात्र, तो व्यर्थ ठरला. मुलीच्या वडिलांनी तातडीने राहुरी पोलिस ठाणे गाठून हा प्रकार पोलिसांसमक्ष कथन केला.
त्यांनी दिलेल्या माहितीनुसार याप्रकरणी अज्ञात व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. याप्रकरणाचा
पुढील तपास राहुरी पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक नंदकुमार दुधाळ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस नाईक अमित राठोड करीत आहेत.